TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा.रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील २३ अधिकार्‍यांना आयएएस श्रेणीत पदोन्नती

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in मुक्ताईनगर, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील २५ पैकी २३ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरील अधिकार्‍यांना भारतीय प्रशासन सेवेत २ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पदोन्नती प्राप्त झाली आहे. यासाठी रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा. रक्षाताई खडसे यांनी विशेष प्रयत्न केले होते.

 

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

महाराष्ट्र शासनातील आयएएस संवर्गात एकूण ४१५ जागा आहेत. त्यापैकी सन २०१८ मध्ये केंद्र शासनाकडून केवळ ३१८ पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या असून ९७ जागा रिक्त होत्या. त्या ९७ रिक्त जागांपैकी २०१८ या वर्षाकरीता पदोन्नतीने २५ जागा महाराष्ट्र शासनातील अधिकार्‍यांकरीता उपलब्ध झाल्या होत्या. परंतु २५ जागांसाठी पदोन्नती समितीची बैठक संघ लोकसेवा आयोगाकडून तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाकडून आयोजित केली जात नव्हती.

कोरोना विषाणू लॉकडाऊन काळात सगळे कामकाज ठप्प झाल्याने त्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. खा. रक्षाताई खडसे यांनी हा प्रश्‍न लोकसभेच्या इतर मागास वर्ग कल्याण समिती समोर उपस्थित केला व अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरील अनेक अधिकारी पदोन्नतीस पात्र असूनही २०१८ पासून आयएएस पदावरील पदोन्नती समितीची बैठक आयोजित झालेली नसल्याने त्यातील काही अधिकारी सेवानिवृत झाल्याने मागास वर्ग कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याची बाब समितीसमोर मांडली. लोकसभेच्या इतर मागास वर्ग कल्याण समितीचे अध्यक्ष खा. गणेश सिंह यांनी या प्रकरणाची तातडीची निकड लक्षात घेऊन कोविड -१९ विषाणूच्या साथीच्या नियमावलीप्रमाणे सदर प्रकरणी तातडीने इतर मागास वर्ग कल्याण समितीची बैठक दि.२९ जून रोजी घेण्यात आली. या बैठकीत केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयास याप्रकरणी पदोन्नती समितीची बैठक तातडीने आयोजित करण्याचे निर्देश द्यावेत, असे खा. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले.

समितीच्या निर्देशाप्रमाणे केंद्र शासनाने संघ लोकसेवा आयोगाकडे पदोन्नती समिती आयोजित कारण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार दि.३ सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने राजपत्रात या पदोन्नतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. लोकसभेच्या इतर मागास वर्ग कल्याण समितीने खा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विनंतीप्रमाणे केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयास याप्रकरणी पदोन्नती समितीची बैठक तातडीने आयोजित करण्याचे निर्देश दिल्यामुळे आज कोरोना विषाणू काळात महाराष्ट्र शासनास २३ आयएएस अधिकारी मिळाले असून प्रशासन त्यामुळे मजबूत झाले आहे व तीन वर्षापासून भाप्रसेमध्ये पदोन्नती रखडलेल्या अधिकार्‍यांना न्याय मिळाले आहे. विशेष म्हणजे २३ पैकी २ अधिकारी पदोन्नतीविना सेवानिवृत्त झाले होते. आता त्यांना पुन्हा भाप्रसेमध्ये नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२३ नामनिर्देशित आयएएस अधिकार्‍यांमध्ये ६ इतर मागास वर्ग, २ भटके व विमुक्त, १ अनुसूचित जाती, ३ आदिवासी आणि ११ खुल्या प्रवर्गातील अधिकारी आहेत. याप्रकरणात रावेर लोकसभा मतदार संघाचे खा. श्रीमती रक्षाताई खडसे व उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खा.ओम राजे निंबाळकर यांचे व लोकसभेच्या इतर मागास वर्ग कल्याण समितीचे अध्यक्ष खा. गणेश सिंह व समिती सदस्यांचे सहकार्य लाभले. याबद्दल खा. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सर्वांचे आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
Next Post

कंगणा राणावत व आमदार राम कदम यांचा कॉंग्रेसतर्फे निषेध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फरार आरोपीला चाळीसगावतून अटक ; एलसीबीची कारवाई !

November 3, 2020

बंगालच्या जनतेने एका क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली : बाबुल सुप्रियो

May 3, 2021

एकावर प्राणघातक हल्ला ; धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

September 15, 2023

मुख्यमंत्री घेणार मंत्रालयाचा निरोप? ; दुपारी सर्व सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक 

June 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group