धरणगाव (प्रतिनिधी) येथील जनकल्याण पतसंस्थेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा धरणगाव तालुका यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला आज सकाळी प्रारंभ झाला. ज्या नागरिकांना रक्तदान करायचे असेल त्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत जनकल्याण पतसंस्थेत, यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचा वतीने करण्यात आले आहे. यावेळी माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन, शिरीष बयस, पालिकेतील गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, दीपक चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
















