जळगाव (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम सबंध जुळून आल्यानंतर एक ३४ वर्षीय विवाहितेने चक्क नैनितालपासून काही अंतरावर नेपाळ देशाच्या बॉर्डरजवळ असलेल्या एका छोट्याशा गावात पोहचली. धक्कादायक म्हणजे प्रियकर तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेत घरी परत येण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील ३४ वर्षीय विवाहितेची नेपाळ देशाच्या बॉर्डरजवळ असलेले एका छोट्याशा गावातील एका २२ वर्षीय तरुणासोबत गेल्या वर्षभरापूर्वी ओळख निर्माण झाली. त्यातून दोघांचे संबंध जुळले. काही दिवस प्रेमाच्या गप्पा मारल्या. यानंतर विवाहिता पळून जात थेट उत्तर प्रदेशातून नेपाळ बॉर्डरवर पोहाेचली. त्या तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय तिने घेतला. कुटंुबीयांसोबत पुन्हा घरी येण्यास नकार दिला. हताश झालेले कुटंुबीय व पोलिस मंगळवारी जळगावात परतले. विशेष म्हणजे त्या विवाहितेला १४ वर्षांचा एक मुलगा आहे. दरम्यान, पत्नी अचानक गायब झाल्यानंतर पटीने १५ ऑगस्ट २०१९ रोजी पत्नी हरवल्याची तक्रार तिच्या पतीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात केली. तांत्रिक माहितीच्या आधारे जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रवीण भोसले व शेखर जोशी हे महिलेचे पती व मुलगा या दोघांसोबत स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने नैनितालपासून काही अंतरावर नेपाळ देशाच्या बॉर्डरजवळ एका छोट्या गावात पोहचले. याठिकाणी ती महिला आणि संबंधित तरुण मिळून आले. या विवाहितेने पती, मुलासोबत पुन्हा जळगावात येण्यास नकार दिला. याच तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेत जळगावला परतण्यास नकार दिला.