TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी २५ कोटींची योजना मंजूर करणार ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पूल व रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन; विश्रामगृहासह दोन नवीन पुलांनाही मान्यता

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) चांगले रस्ते व पूल हे फक्त दळण – वळणासाठी नाही तर जनतेच्या सोईसाठी देखील उपयुक्त आहेत. जनतेला दिलेल्या वचनांची पूर्ती करत असताना आपण राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य दिले आहे. पाळधी गावासाठी गिरणा नदीवरून २५ कोटींची योजना मंजूर करणार असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जागेत शासनाच्या परवानगीने पाण्याची टाकी बांधणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी बु. येथे २ कोटी ३८ लक्षच्या पुलाचे व रस्त्याच्या कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते. तर याचसोबत पाळधी गावासाठी दोन नवीन पुल व शासकीय विश्रामगृहांची कामे देखील मंजूर असून त्यासाठी २ कोटी ४३ लक्ष निधी मंजूर असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पाळधी येथे १ कोटी ४३ लक्ष निधीतून रेस्ट हाऊससाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून नाबार्ड – २५ मधून पाळधी गावाजवळील चांदसर रस्त्यावर तसेच पथराड रस्त्यावर लहान पुलासाठी १ कोटी निधी मंजूर आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. गावाचा विस्तार झपाट्याने होतअसून वाढीव वस्तीत पुढील काळात रस्त्यांचे खडीकरण करणार असल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

READ ALSO

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

१६ लाखाचे बौद्ध विहार

पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे व कार्यकर्ते यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे गावात भव्य असे बौद्धविहार व्हावे अशी मागणी करताच ना. पाटील यांनी १६ लक्ष निधी आमदार निधीतून देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे भीमसैनिकांची इच्छा पूर्ण होणार असून बौद्धविहाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार !

पाळधी पथराड झुरखेडा दहिदुल्लारस्ता प्रजिमा ५७ किमी ० /०० ते ०/७०० मशिदी पासून ते बस स्टॅन्ड पर्यंत अशी एकूण ७७० मीटर लांबी चे काम ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे, रस्त्याची सुधारणा करणे व पाळधी गावात लहान पुलाचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.

सदर कामास मार्च २०२० च्या अर्थसंकल्पानुसार रुपये ३ कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. सदर कामाची टेंडर किंमत २ कोटी ३८ लक्ष इतकी आहे. कोविड च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील कामे सुरू करता येऊ शकली नव्हती. सदर रस्त्याच्या व पुलाच्या कामामुळे पाळधी मधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न देखिल सुटणार आहे.

नवीन कामांचेही प्रस्ताव

दरम्यान, पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, आज करण्यात आलेल्या भुमिपुजनासोबत गावात अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. यातील लक्षणीय कामे म्हणजे पथराड आणि सोनवद या दोन गावांना जाणार्‍या रोडवर दोन स्वतंत्र पूल होणार आहेत. तर पाळधी येथे सुसज्ज शासकीय विश्रामगृहाला देखील मान्यता मिळाली असून एकूण यासाठी २ कोटी ४३ लक्ष निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, उपसभापती शारदाताई प्रेमराज पाटील, चांदसर सरपंच सचिन पवार, आसाराम कोळी, अनिल पाटील, पाळधी बु. सरपंच अलकाबाई प्रकाश पाटील, पाळधी खु. सरपंच सुनंदाबाई भगवान माळी, शरद कोळी, उद्योगपती शरद कासट, दिलीप पाटील, माजी सरपंच सुनंदाबाई माळी, अनिल देशमुख, युवासेनेचे आबा माळी, सा. बा. विभागाचे उप अभियंता मुकेश ठाकूर, शाखा अभियंता व्ही. टी. महाजन, बी.एस. माळी, गोकुळ नाना पाटील, बबलू पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना, व महिला आघाडीच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकात पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी सदर रस्ते व पुलाबाबत सविस्तर माहिती दिली. आभार युवासेनेचे आबा माळी यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले १९ कोरोनाबाधित, ३४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप

January 20, 2021

लग्‍नाच्या अवघ्या दहा दिवसानंतर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या !

July 21, 2021

काँग्रेस नेते राहुल गांधी याना कोरोनाची लागण

April 20, 2021

ईडी विरोधात संजय राऊत पंतप्रधान मोदींना देणार पत्र ; म्हणाले..!

March 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group