धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरात व पाळधी दूरक्षेत्र भागात बकरी ईद अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे काल सर्च ऑपरेशन करण्यात आले. यावेळी ३४ गुरे मिळून आले. त्यापैकी २० गुरे धरणगाव शहरात कुरेशी मोहल्ला भागात व १४ गुरे पारधी दूरक्षेत्र हद्दीत मिळून आली. सदर गुरांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गोशाळेत टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई धरणगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
सर्च ऑपरेशन पथकात पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, गोकुळ गवारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल खुशाल पाटील, करीम सय्यद, पोलीस नाईक मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदांशिव, वैभव बाविस्कर, संदीप पाटील, अनिल साळुंखे, अंकुश बाविस्कर, दीपक पाटील, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगला पवार व ज्योती चव्हाण यांनी काम पाहिले आहे.