बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील शेलवड शिवारातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या संदर्भात अधिक असे की, बोदवड तालुक्यातील सिताराम भावडू धनगर यांच्या शेताच्या बांधावरील चिचेंच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने मोतीलाल भिमराव सपकाळे (वय ३४, रा.नवीदाभाडी ता. जामनेर) याने आज दुपारी तीनवाजेच्या सुमारास नैराश्य भावनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नामदेव नथु सपकाळे यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कांस्टेबल विलास महाजन हे करीत आहे.