धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सतखेडा येथील दोन वर्षीय चिमुकल्याचा गावातील स्मशानभूमीजवळील अंजनी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. सोनू सुरेश बारेला (वय २, रा. सबखेडा, ता. धरणगाव), असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.
सतखेडा येथील दिलीप पाटील यांच्या खळ्यात बारेला कुटुंबीय वास्तव्याला होते. बुधवारी सकाळी गावातील काही शेतकरी हे शेतात जात असताना, सतखेडा गावातील स्मशानभूमीजवळील अंजनी नदीपात्रामध्ये सोनू बारेला हा चिमुकला पाण्यात बुडाल्याचे दिसून आले.
















