TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव युनियन बँकेच्या व्यवस्थापकच्या विरोधात शेतकऱ्याचे आमरण उपोषण

गुलाबराव वाघ यांनी उपोषणकर्ते व शाखा व्यवस्थापक मोरे यांच्याशी केली चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक भूषण मोरे यांच्या मनमानी कारभार विरोधात बँकेच्या आवारातच शेतकऱ्याचे आमरण उपोषण दि. १९ सप्टे, २०२२ सोमवार पासुन सुरू केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, शेतकरी योगेश रामलाल पुरभे (रा. मोठा माळी वाडा) धरणगाव हे युनियन बँक ऑफ इंडिया धरणगाव शाखेचे जुने खातेदार असुन प्रतिवर्षी शेतकरी पुरभे व त्यांच्या पत्नीच्या नावे शेतीसाठी नियमित पीककर्ज घेत होते व घेतलेल्या कर्जाची रक्कम नियमीत वेळेवर न चुकता बँकेला परतफेड केली आहे. परंतु मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतात पीक आले नाही. व जे काही पीक हाती आले ते नाईलाजास्तव कमी दराने विक्री करावे लागले. त्यातही कोरोणा महामारी असल्यामुळे शेती मालाला भाव मिळाला नाही. कोविड १९ च्या महामारीत तर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली होती. याकारणाने मी बँकेचे कर्ज वेळेवर परत फेड करू शकलो नाही. परंतू आम्ही पती-पत्नीने काबाड कष्ट केला, व कोरोना सारख्या जीवघेण्या महामारीशी दोन हात संघर्ष करीत आम्ही कोरोनातून सावरलो. आणि अश्याही आर्थिक हालाखीची परिस्थितीत थकीत हप्ताचे कर्ज दि. २ फेब्रुवारी, २०२२ रोजी बँकेच्या आकडेवारीनुसार व्याजासकट परतफेड केले. तद्नंतर गेल्या ऑगस्ट महिन्यात युनियन बँकेचे व्यवस्थापक श्री. भुषण मोरे साहेब यांना पीक कर्ज संदर्भात मागणीसाठी गेलो असता त्यांनी आम्हाला होकार देत सांगितले की, पीक कर्जसाठी चे प्रकरण तयार करुन बँकेकडे सादर करा, मी तुम्हाला दोन दिवसात नविन पीक कर्ज उपलब्ध करून देतो. तद्नंतर मी शाखा व्यवस्थापक श्री. मोरे साहेब यांच्याकडे पीककर्ज साठी निरंतर गेलो असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत टाळण्याचा प्रयत्न केला.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

कित्येक वेळा तोंडी व पत्र व्यवहार केला. आज रोजी मला शेतीसाठी पीक कर्जाची अत्यंत गरज आहे, तसेच मी शेतीसाठी अनेकांकडून हात उसनवारी पैशांची मदत घेतली असुन सद्या माझी आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झाली असून माझ्यावर व माझ्या परिवारावर आत्महत्येची वेळ आली आहे. तरी सुद्धा मी मा.शाखा व्यवस्थापक मोरे साहेब माझी दखल न घेता, काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी मला सबळ कारण न सांगता सांगितले की, तुला मी मुळीच पीककर्ज देणार नाही. उलट मला अश्लील शिवीगाळ करीत म्हणाले की, जास्त शहाणपणा करशील तर तुझ्यावर गुन्हा दाखल करील, तसेच, तुझ्या माहितीस्तव सांगतो, मी कोणालाही घाबरत नाही, माझ्याबाबतीत तुला जेथे तक्रार करायची असेल तिथे कर..! वरीष्ठ अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, राजकिय पुढारी, जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस स्टेशन, कृषी अधिकारी कोणाकडे पण तक्रार कर मी तुला युनियन बँकेतुन कर्ज देणार नाही अश्या पध्दतीने सदर शाखा व्यवस्थापक मोरे यांनी मला धमकाविले आहे. म्हणून मी न्याय मागावे तरी कोणाकडे..? अशी माझी अवस्था झालेली आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. परंतु धरणगांवात युनियन बँक शाखा व्यवस्थापकाकडुन माझ्यासारख्या सामान्य शेतकरीला अश्या प्रकारे त्रास दिला जात आहे. शासनाचे धोरण आहे, शेतकरी सुखी, तर देश सुखी, शेतकरी जगला पाहीजे. म्हणून मी युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापक श्री. मोरे यांच्या दबावतंत्र व मनमानी विरोधात दि.१९ सप्टे, सोमवार पासून आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. या उपोषणाच्या संदर्भात शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ, धिरेंद्र पुरभे यांनी उपोषणकर्ते योगेश पुरभे व युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक भूषण मोरे यांची भेट घेतली असून मोरे यांना विनंती करीत सांगितले की, कुठंतरी शेतकरी बांधवांना सहकार्य करावे. असे उपोषणकर्ते योगेश पूरभे यांनी सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

संजय राऊत यांना दिलासा नाहीच ; न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे लवकरच सुरू होणार ः रेल्ल्वे मंत्र्यांची ग्वाही

July 3, 2024

Daily Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, शनिवार ५ मार्च २०२२

March 5, 2022

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

February 22, 2021

बंडखोर आमदार दीपक केसरकराची संजय राऊत यांच्यावर सडकून टीका !

June 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group