TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश ; 5.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

vijay waghmare by vijay waghmare
June 26, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या अमरावती येथील अट्टल टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली. या कारवाईत सुमारे ५ लाख ५१ हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अलीकडील काळात गर्दीच्या ठिकाणी खिसे कापून रोख रक्कम चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

२५ जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी प्रविण भालेराव व अक्रम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की, जळगाव बसस्थानक परिसरात अमरावती येथील खिसे कापणारे काही रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरत आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील आणि रविंद्र कापडणे यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग सुरू केले.

तिघांना अटक
पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाल करणारे तीन इसम पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. तात्काळ कारवाई करत पथकाने त्यांना ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणून चौकशी केली. चौकशीत त्यांनी आपली नावे अहमद बेग कादर बेग (वय ६२, रा. मुजफ्फरपुरा, नागपुरी गेट जवळ, अमरावती), हफिज शाह हबीब शाह (वय ४९, रा. बलगाव, सकीनगर, अमरावती) आणि अजहर हुसैन हफर हुसेन (वय ४९, रा. रहमतनगर, अमरावती) अशी सांगितली.

५ लाख ५१ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
अधिक तपास घेतला असता त्यांनी २४ जून रोजी दुपारी जळगाव बसस्थानकात एका प्रवाशाच्या खिशातून १०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांच्या अंगझडतीत ३३,८३० रुपये रोख रक्कम, अंदाजे १७,५०० रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन्स, एक रेक्झीन बॅग आणि अंदाजे ५ लाख रुपये किमतीची टाटा इंडिका व्हिस्टा कार असा एकूण ५ लाख ५१ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी अहमद बेग कादर बेग याच्यावर अमरावती शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आधीच चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तरित्या नियोजन करून प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.

दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि बाजारपेठांमध्ये प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित डायल ११२ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

भरदिवसा घडलेला थरार... धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

June 24, 2021

अमळनेरातील कुख्यात गुंड विशाल सोनवणेवर एमपीडीएची कारवाई !

March 16, 2023

केंद्रातील मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही : संजय राऊत

July 29, 2021

मौनी अमावास्येच्या स्नानावेळी प्रयागराजमध्ये भीषण चेंगराचेंगरी

January 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group