वट्टीयारकाव प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षासाठी वट्टीयारकाव मतदारसंघात कालचा दिवस अत्यंत उत्साहवर्धक ठरला. भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे भव्य रॅली व रोड शो उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमामुळे पक्षाच्या प्रचारयंत्रणेला नवी ऊर्जा, स्पष्ट दिशा आणि अधिक बळ मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मतदारसंघाच्या निवडणूक जबाबदारीत प्रवासी प्रभारी म्हणून कार्यरत असलेले आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचे प्रभावी नियोजन करण्यात आले. स्थानिक पातळीवरील समन्वय, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि नियोजनबद्ध कामकाज यामुळे प्रचारमोहीम अधिक गतिमान व परिणामकारक होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार, केरळच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी सौ. श्रीलेखा यांच्या प्रचाराला या रॅली व रोड शोमुळे मोठी चालना मिळाली आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आणि सकारात्मक वातावरणामुळे मतदारसंघात परिवर्तनाची भावना दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सदर कार्यक्रम हा केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता जनतेशी थेट संवाद साधणारा आणि विश्वास दृढ करणारा ठरला. नड्डा यांच्या उपस्थितीत आणि स्थानिक नेतृत्वाच्या समन्वयातून वट्टीयारकावमध्ये भाजपच्या विजयासाठी वातावरण निर्माण होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जनतेचा वाढता विश्वास, कार्यकर्त्यांची एकजूट आणि सक्षम नेतृत्व यांच्या बळावर आगामी निवडणुकीत वट्टीयारकावमध्ये कमळ फुलणार, असा विश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
















