भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील गणेश कॉलनी परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे दि.५ सप्टेंबर रोजी अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील एकास अटक करण्यात आली असून त्यातील दुसरा अद्यापही फरार आहे. आरोपींवर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या आदेशानुसार गुरन ०२२/२०२० कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांची मुलगी दिनांक ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेला मौजे साकरी तालुका भुसावळ येथील सराईत गुन्हेगार अमोल तुळशीराम भोळे यांनी तक्रारदाराची अल्पवयीन मुलगी फूस लावून पळवून नेवून तक्रारदारास शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची फोन वरून धमकी देत असल्याबाबतची तक्रार जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक २३/९/२०२० रोजी दिली होती. यामध्ये अमोल तुळशीराम भोळे व्यसनाधीन व खुनशी तसेच आडदंड प्रवृत्तीचा आहे. त्यांचे राजकारणी व पोलिसांशी संबंध असल्याने त्याला वरील गुन्ह्यातील तपासाची सर्व माहिती त्यांच्या हितचिंतकांकडून मिळत असल्याने मुलीचा शोध लागत नव्हता. मुलीचा शोध घेऊन ताब्यात मिळावी तसेच अमोल तुळशीराम भोळे व त्यांचे साथीदार सह त्यांच्यावर कायम स्वरूपी कारवाई करण्याबाबतची तक्रार अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी (तक्रारदार) पोलीस अधीक्षक दिली आहे. तसेच तक्रारदाराला न्याय न मिळाल्यास महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२० रोजी तालुका पोलीस स्टेशन समोर कुटुंबासह व नातेवाईक असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
यानंतर पोलीस अधिक्षक यांनी तक्रार अर्जाची दखल घेत तालुका पोलिस निरीक्षकांना आदेश दिले असावे ? ५ सप्टेंबरपासून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून आद्यपवतो मुलीचा तपास का लागत नाही ? या आदेशाचे पालन करीत दि.23 सप्टेंबर रोजी तालुका पोलीस ठाण्याचे पथक पुणे चाकण येथे रवाना झाले व रातोरात मुलीस ताब्यात घेऊन परतले. ही मुलगी पुणे येथे रेल्वेने गेली की बसने गेली की खाजगी वाहनाने गेली ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पोलिसांना दि. 5/9/2020 पासून दाखल असलेल्या अपहरण झालेल्या मुलीचा शोध हा तक्रारदाराने अर्ज दिल्यानंतर रातोरात कसा लावला असावा ही एक संशोधनांची बाब आहे. या प्रकरणी उशिरा तपास लावण्यामागे आर्थिक तडजोड तर नसावी? असे अनेक प्रश्न समोर उदभवत आहेत. अर्जात नमूद केलेल्या अपहरण करणाऱ्या अमोल तुळशीराम भोळे यास दि. 24 सप्टेंबर 2020 रोजी अटक केली असून साथीदार हे मोकाट फिरत आहेत.