जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सोन्याच्या दुकानातून दहा ग्रम वजनाचा शिक्का मागविण्याच्या उद्देशाने, डॉक्टर असल्याची बतावणी करत एक व्यक्ती हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे सांगून कर्मचारीला गेटवर अडवून सोन्याचा शिक्का घेतला. त्यानंतर, शिक्का घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या डॉक्टरांकडून पैसे घेण्यास सांगितले आणि या प्रकारे भंगाळे गोल्डमधील सेल्समनची ८७ हजार ७७५ रुपयांमध्ये फसवणूक केली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भंगाळे गोल्डच्या शोरुम मध्ये रामगुलाम कौशलप्रसाद त्रिपाठी हे सेल्समन म्हणून नोकरीस आहे. दि. १६ रोजी काम करीत असतांना शोरुमचे मॅनेजर मनोज गरुड यांनी त्यांना ऑर्कीड हॉस्पिटल येथील डॉ. जैन यांनी १० ग्रॅमचा सोन्याचा शिक्का मागविला आहे. तो शिक्का रिसेप्शनला देवून तेथून ८७ हजार ७८६ रुपये घेवून घ्या असे सांगितले. त्यानुसार त्रिपाठी हे सोन्याचा शिक्का घेवून हॉस्पिटलमध्ये जात असतांना एका इसमाने त्यांना आवाज दिला. त्याने आपणच डॉ. अग्रवाल असून डॉक्टर साहेब बाहेर बसले आहे असे म्हणत त्यांच्याजवळ असलेला शिक्का मागितला. त्रिपाठी यांनी तो शिक्का देत पैशांबाबत विचारणा केली, त्यावेळी त्या इसमाने डॉक्टर साहेब बी.जे. मार्केटमध्ये बसले असून ते तिकडे जावू लागले.
पेट्रोलपंपावर दिसून आली नाही कार
काही अंतरापर्यंत गेल्यानंतर त्या इसमाने मी हॉस्पिटलमधून मॅडमांकडून पैसे घेवून येतो असे म्हणत तो गेला. काही वेळातच तो त्रिपाठी यांच्याजवळ आला, त्याने मॅडमने सांगितले की, बेंडाळे चौकातील पेट्रोल पंपाजवळ महाजन साहेब कारमध्ये थांबले असून तुम्ही लवकर तेथे जा असे सांगितले. त्यानुसार त्रिपाठी हे पेट्रोलपंपावर गेले मात्र त्याठिकाणी कोणतीही कार आणि महाजन नामक व्यक्ती मिळून आला नाही.
दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईवरुन फोन करुन मागविला शिक्का
फोन क्रमांक असलेल्या गौरव खैरनार याची चौकशी केली असता, त्याने तो दुपारी दीड वाजेच्या सुमारास निलम वाईन्सजवळील गल्लीत होता. त्यावेळी एका व्यक्तीने त्याचा मोबाईल फोन करण्यासाठी मागितला आणि त्यावरुन त्या इसमाने सोन्याच्या दुकानात फोन करुन सोन्याचा शिक्का मागवून त्याचे पैसे न देता फसवणूक केली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफी संजय शेलार करीत आहे.
अनोळखी व्यक्तीच्या मोबाईवरुन केला फोन
त्रिपाठी यांना संशय आल्याने ते लागलीच ऑर्कीड हॉस्पिटलमध्ये डॉ. अग्रवाल यांच्याबाबत विचारपूस केली. मात्र त्याठिकाणी कोणीही अग्रवाल नसल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर मॅनेजर गरुड यांना आलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता, तो मोबाईल क्रमांक गौरव राजू खैरनार रा. पांझरापोळ या इसमसाचा असल्याचे समजले.