चोपडा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या सावखेडा तापी नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
या संदर्भात अधिक असे की, नांदेड येथील तुळशीराम पावरा (वय-३१) आणि त्याचा मित्र (नाव अद्याप कळू शकले नाही) हे दोघं जण रात्री ८ वाजेच्या सुमारास चोपड्याहून नांदेड येथे घरी परत येत होते. परंतू अचानक समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅन (एमएच-१९,एस.६५०४) सोबत जोरदार धडक झाली. या अपघातात तुळशीराम आणि त्याचा मित्र हे दोघं जागीच ठार झाले. दरम्यान, या अपघातामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















