धरणगाव (प्रतिनिधी) मैत्रीचा गैरफायदा घेत विवाहितेवर एकाने अत्याचार केला तर दोघांनी अंगलटपणा करण्याचा प्रयत्न केला. तसेच एकाने खिडकीतून चिठ्ठी फेकत फोन करण्याचा इशारा केला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिकेत जिजाबराव पाटील याने पिडीतेसोबत मैत्री केली. दोघं जण फोनवर बोलत असत व इन्टाग्रामवरही मॅसेज करत असत. दरम्यान, पिडीता घरी एकट्या असतांना जुन २०२४ – मध्ये तिन वेळा घरात येवून जबरदस्तीने शाररिक सबंध ठेवले. तसेच गावातील धीरज भाऊसाहेब पाटील, निलेश उर्फ बाळा मनोहर पाटील, हिरालाल उर्फ बाळा शांताराम पाटील यांनी पिडीता घरात एकटी असतांना घरात घुसुन त्यांच्याशी अंगलटपणा करुन तु कोणास काही सांगीतल्यास नव-यास जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे निलेश पाटील याने पिडीतेच्या घराच्या खिडकीतून मोबाईल नंबर लिहलेली चिठ्ठी टाकुन फोन करण्याचा इशारा केला. दरम्यान, रात्री अज्ञात कोणतरी पिडीतेच्या घराच्या जिन्यात विटा मारुन फेकल्या. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि संतोष पवार हे करीत आहेत.