जळगाव (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक मंडळ तसेच बीएचआरच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून सीबीआयचे पथक जळगावातील शहरातील शासकीय अजिंठा विश्रामगृहात तळ ठोकून आहे. आज या पथकाने चाळीसगाव खंडणी प्रकरणातील घटनास्थळाची पाहणी केली तसेच संशयित उदय पवार यांची चौकशी केल्याचे देखील कळते.
सीबीआय पथकाने आतापर्यंत फिर्यादी सुरज झंवर, सुनील झंवर यांच्यासह निलेश भोईटे, आयुष मणियार व विशाल पाटील यांचे जबाब नोंदवले आहेत. चाळीसगाव येथे दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील फिर्यादी सूरज झवर हे फिर्यादी आहेत. या गुन्ह्यात माणियार व पाटील हे दोघे मुख्य साक्षीदार आहेत. खंडणी मागण्यासाठी उदय पवार व ॲड. प्रवीण चव्हाण यांनी ज्या व्यक्तीस पाठवले होते, त्या व्यक्तीने मणियार व पाटील यांच्या समोर झवर यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याचा आरोप झवर यांनी फिर्यादीत केला आहे.
या अनुषंगाने अनेकांचे जबाब सीबीआयच्या पथकाने नोंदवले आहेत. दरम्यान, आज पथकाने चाळीसगाव येथे जाऊन आज घटनास्थळाची पाहणी पाणी केल्याचे कळते. दरम्यान,उदय पवार हे माजी खासदार उमेश पाटील यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते.
चाळीसगावच्या मध्यस्तीमार्फत खंडणी मागितल्याचा फिर्यादीत आहे आरोप !
अॅड. प्रविण चव्हाण, विशेष सरकारी वकील यांनी सदर त्रयस्थ इसमातर्फे मला निरोप दिला की, “तुझे वडीलांची चार पाच वर्षे जेलमध्ये वाट लावुन टाकतो मी यापुर्वी सुरेशदादा जैन, डिएसकेचे कुलकर्णी व इतर आरोपींची देखील अशीच वाट लावलेली आहे. तुमच्या कुंटूबीय यांची जप्त केलेली बँक खाती पुढील दहा वर्षात मुक्त होऊ देणार नाही. तेव्हा काहीतरी पुर्तता कर. तरच फायदा होईल. अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. मध्यस्थ इसमाने मला स्पष्टपणे सांगितले की, तुझे सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांनी चाळीसगाव येथील ओरीजनल वाईन शॉपचे मालक उदय नानासाहेब पवार याच्यामार्फत हा निरोप पाठविला आहे. व त्यासंदर्भात योग्य तो निर्णय तुझा तु घेऊन टाक. माझा या प्रकरणाशी काहीएक संबंध नाही. असे सांगितल्याने मी लगेच उदय पवार या इसमांबाबत अधिक माहिती घेतली असता, असे कळाले की, उदय पवार यांचे वडील कै. अॅड. नानाभाऊ जंगलु पवार हे पेशाने वकील होते व त्यांचे सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांच्याशी कौटुंबिक व जिव्हाळयाचे संबध होते.