धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध विधितज्ञ ऍड. दिलीप रावतोळे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
एलआयसीचे डेव्हलपमेंट ऑफिसर गणेश रावतोळे यांचे बंधू तसेच गुड शेपर्ड स्कुल धरणगावच्या प्रा. चैताली रावतोळे यांचे पती ऍड. दिलीप रावतोळे यांचे दुःखद निधन झाले आहे. आज सकाळी सर्व वकील मित्रांसोबत दिलीप रावतोळे नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळायला गेले होते. बॅटिंग करत असतांना अचानक खाली कोसळले. रावतोळेंच्या मित्रांनी त्यांना शर्थीचे प्रयत्न करून ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले. सर्व प्रकारचे प्रयत्न करून बघितले परंतु यश आले नाही. शेवटी दिलीप रावतोळे यांची रुग्णालयात प्राणज्योत मालवली.
















