TheClearNews.Com
Tuesday, April 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात तालुक्यात १२ वर्षानंतर आमसभा ; आमदार मंगेश चव्हाण यांचे ‘ऑन द स्पॉट’ निर्णय !

अभिनंदनाच्या विविध ठरावांसह कर्तव्यात कसूर व कामांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या आमदार मंगेश चव्हाण यांनी केल्या सूचना !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2023
in चाळीसगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती शिवाजी महाराज चौक चाळीसगाव येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी 12 वर्षांपूर्वी 5 मार्च 2011 रोजी शेवटची आमसभा घेण्यात आलेली होती. त्यांनतर आज या आमसभेचे आयोजन करण्यात आले. या आमसभेचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी जबाबदारी पार पाडली. सदर आमसभेला चाळीसगाव तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दिली, तसेच सदर या आमसभेचे प्रक्षेपण फेसबुक व युट्युब वर लाइव्ह करण्यात आले होते. सदर प्रक्षेपण राज्यभरात लाखो लोकांनी पाहत आजपर्यंत न बघितलेली आमसभा अनुभवली. विशेष म्हणजे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांचे ‘ऑन द स्पॉट’ निर्णय घेतल्यामुळे आमसभा लक्षवेधी ठरली.

या आमसभेची प्रस्तावना गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी आमसभेची पूर्वतयारी, आमसभेचे महत्त्व,तसेच चाळीसगावातील आमसभेचा इतिहास, रुपरेषा याबाबत माहिती सांगितली. विविध विभागांनी त्यांच्या विभागांच्या माहितीसह योजनांची व कामांची माहिती दिली. पीपीटीच्या माध्यमातून प्रत्येक विभागाने आपले सादरीकरण केले. सादरीकरण झाल्यानंतर त्या विभागासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आमदार श्री. मंगेश दादा चव्हाण यांनी ऐकून घेतल्या. तक्रारींची पूर्तता करण्यासंदर्भात संबंधित विभागांना आदेश केले. आपल्या विभागातील योजना संदर्भात सविस्तर माहिती व आलेल्या तक्रारी संदर्भात स्पष्टीकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिले.

READ ALSO

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

आमसभेमध्ये मांडलेल्या सर्व समस्या व तक्रारी संदर्भात पुढील पंधरा दिवसात पुन्हा सर्व विभागांची बैठक घेण्यात येऊन त्याबद्दल आढावा घेतला जाणार आहे. प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, महावितरण कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी हडपे, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक जाधव, मेहुनबारे सहा. पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, यांच्यासह ३० हुन अधिक शासकीय विभागांचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.आमसभेसाठी 40 विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्या सोबतच क्षेत्रीय स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, केंद्रप्रमुख, सर्कल, मुख्याध्यापक हे शासकीय कर्मचारी देखील उपस्थित होते. माजी सभापती, उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक इत्यादी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 06 वाजेपर्यंत तब्बल 07 तास आमसभा सुरू होती.

आमसभा चालू असतानाच दिला लाभ !
आमसभा सुरू असताना विविध नागरिकांनी आपल्या तक्रारी आमसभेसमोर मांडल्या. विजय शर्मा यांनी महावितरण कडून घरातील मीटर बदलून मिळावे अशी आपली समस्या मांडली. त्यानंतर आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सूचनेनुसार त्यांना अवघ्या चार तासातच महावितरणकडून मीटर बसवून देण्यात आले. याबाबत विजय शर्मा यांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो व आमदार साहेबांच्या आभाराची पोस्ट प्रसारित केली. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनचा ठराव आमसभेमध्ये मांडण्यात आला.

जूनपाणी पासून ते गुजरदरीपर्यंत स्वतंत्र रस्ता करण्याची घोषणा !
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गुजरदरी जोडले जाणार चाळीसगाव तालुक्याच्या मुख्य रस्त्याशी गुजरदरी हे चाळीसगाव तालुक्यातील नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील शेवटचे गाव. या गावाला जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यामधून जावे लागत होते. जवळपास चाळीसगाव शहरापासून 65 किलोमीटरचा फेरा येथे जाण्यासाठी पडत होता. ही समस्या लक्षात घेऊन आमसभेमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार जूनपाणी पासून ते गुजरदरीपर्यंत स्वतंत्र रस्ता करण्याची घोषणा करण्यात आली.

ऑन द स्पॉट निर्णय !
2021 साली आलेल्या पुरामध्ये बाधित झालेल्या नागरिकांनी आपले गाऱ्हाणे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या समोर मांडले. त्यांनी लगेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना फोन करून याबाबत कल्पना दिली असता त्यांनी 02 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी अथवा मंत्रालयात मदत मिळण्यासंदर्भात बैठक लावण्याचे आश्वासन दिले. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या या ‘ऑन द स्पॉट’ निर्णयामुळे सर्व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

आमसभेत मंजूर झाले ९ ठराव !

आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या आमसभेत उपस्थित होत असलेल्या विविध विषयांच्या अनुषंगाने आमसभेचे ठराव पारित करण्यात येत होते. यात अभिनंदनाच्या ठरावांसह कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव संमत करण्यात आले.

आमसभेत मंजूर झालेले ठराव !

१) इसरो मार्फत चांद्रयान – ३ यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करणारा ठराव माजी जिल्हा परिषद सभापती पोपट भोळे यांनी मांडला.

२) १२ वर्षानंतर जनतेच्या प्रश्नांसाठी आमसभा आयोजित केल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील मांडला असता उपस्थितांनी टाळया वाजवत त्याला संमती दिली.

३) चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी मांडला.

४) गावातील विधवा, परितक्त्या, भूमिहीन यांना घरकुल व इतर लाभ देताना प्रथम प्राधान्य देण्यात यावे असा ठराव आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडताच उपस्थितांनी टाळया वाचवत त्याचे स्वागत केले.

५) नगरपरिषद डम्पिंग ग्राउंड मध्ये वारंवार लागणाऱ्या आगीमुळे टाकळी प्रचा व ओझर भागात होणारे प्रदूषण लक्षात घेता त्याची गंभीर दखल सदर आमसभेत घेण्यात आली. लवकरच याबाबत कचरा डेपो हलविण्यात यावा किंवा जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कार्यवाही करण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला.

६) चाळीसगाव शहरालगत असणाऱ्या गोत्रे मळा ते डेराबर्डी परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर भाग हा चाळीसगाव नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात यावा असा ठराव देखील यावेळी मांडण्यात आला.

७) चाळीसगाव MIDC मधील गुजरात अंबुजा कंपनीमुळे चाळीसगाव नागरी वस्तीत येणाऱ्या उग्र वासामुळे नागरिकांचे होणारे हाल व आरोग्याची हानी चा मुद्दा यावेळी मांडण्यात आला, त्यावर संबंधित कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर कार्यवाही करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

८) चाळीसगाव शहरात अनधिकृत बॅनर्स यामुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण व रहदारीस अडथळा येत असल्याने त्यासाठी परवानगी व शुल्क आकारणी साठी एजन्सी नेमण्याची निविदा प्रसिद्ध करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

९) चाळीसगाव MIDC मध्ये प्रस्तावित असणाऱ्या कत्तलखान्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे, याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सामाजिक संघटना, नागरिक यांनी देखील विविध माध्यमातून याला लेखी विरोध केला आहे. सदर कत्तलखान्याची मंजुरी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी असा ठराव आमसभेत मांडताच उपस्थितांनी मोठ्या उत्साहात त्याला मंजुरी दिली.

 

कामचुकार अधिकाऱ्यांना ताकीद !

जिल्हा परिषद ल.पा. उपअभियंता चंद्रकांत शिंपी यांच्या बाबतीत देवळी सह डोणदिगर, दहिवद येथील कामांबाबत तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे आल्या होत्या. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी विषय उपस्थित केला असता संबंधित उपअभियंता शिंपी हे सदर आमसभेला पूर्व परवानगी न घेता गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर उपअभियंता शिंपी याच्यावर हक्कभंग आणून निलंबनाची कारवाई करण्याचा तसेच तक्रारी असणाऱ्या कामांची चौकशी करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी केल्या.

महिला बचत गटातील विविध योजनांचा लाभ देण्यात होत असलेला गैरप्रकार, मानव विकास मिशन मधील अनागोंदी, बचत गटातील महिलांना दिला जाणारा त्रास याबाबत आमसभेत तक्रारी करण्यात आलाय. याची गंभीर दखल घेत ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक संदीप पाटील यांची चौकशी करून बदली किंवा निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या.

वनविभागाच्या सामाजिक, प्रादेशिक व वन्यजीव या तीनही विभागामार्फत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता त्यासाठी तीन सदस्यीय समित्यांनी चौकशी करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

मेहुणबारे ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना अवैध धंदे बंद करावेत याबाबत वारंवार सुचना देऊनही कामात सुधारणा होत नाही त्यांची चौकशी करून निलंबनाचा अथवा बदलीच्या सूचना करण्यात आल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

April 18, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
Next Post

सापावर पाय पडला पण सर्पदंश झाला नाही...तरीही ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात ४८ निगेटिव्ह ; ३६ पॉझिटिव्ह

November 30, 2020

‘महाराष्ट्रात तू कशी फिरते, ते बघतोच’, तुलाही तुरुंगात डांबू : खासदार नवनीत राणा

March 23, 2021

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

October 22, 2020

पत्रकार बांधवांच्या मागण्यांसाठी आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

September 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group