TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लूटल्यानंतर चोरट्यांनी मला पेट्रोल टाकून जिवंत जाळले ; तरुणाचा बनाव !

पोलीस तपासात मात्र, उघड झाला धक्कादायक प्रकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) रस्त्याने जात असलेल्या तरुणाला लूटल्यानंतर चोरट्यांनी त्याला पेट्रोल टाकून जाळल्याचा बनाव करीत एका तरुणाने स्वतःला जाळून घेतले होते. परंतू तरुणाने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबावरुन आपणच स्वतःला पेटवून घेतल्याची कबुली दिल्यामुळे संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. भूषण दिलीप पाटील (वय ३० रा. घोडगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं !
चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे भूषण पाटील हा अविवाहीत तरुण वास्तव्यास होता. शेती काम करुन तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. दि. ११ रोजी तो चोपडा येथे आला होता. परंतु सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. सायंकाळच्या सुमारास बाटलीत पेट्रोल घेवून तो धरणगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ आला. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत जाळून गेले. काही क्षणातच भूषण पुर्णपणे भाजला गेल्याने त्याने अंगाची होणारी लाहीलाही कमी होण्यासाठी शेजारीच असलेल्या पाटचारीच्या पाण्यात उडी घेतली, आणि रात्रभर तो पाटचारीतील पाण्यातच बसलेला होता. गुरुवारी सकाळच्या सुमारास पाटचारीजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईलवरुन भूषण नातेवाईकांसोबत संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी त्याने आपल्याला चोरट्यांनी माझ्याकडील रक्कम लूटून घेत पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे सांगितले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या भूषणला तात्काळ चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

पोलिस अधीक्षकांनी दिल्या तपासाच्या सूचना !
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, चोपडा शह पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह एलसीबीच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पथकाला या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपासाबाबत सूचना दिल्या.

चोरट्यांनी आपल्याला पेट्रोल टाकून पेटवल्याचा रचला बनाव !
जखमी भषणची चौकशी केली असता, त्याने आपण घराकडे जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी आपला मोबाईल चोरुन नेला असे सांगितले. त्यानंतर तेच चोरटे पुन्हा भेटले त्यांनी भूषणला दुचाकीवरुन घेवून जात त्याला पाटचरीजवळ नेले. याठिकाणी त्याला मारहाण करीत त्याच्याकडे असलेली रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी आपल्याला पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे भूषणने पोलिसांना सांगत पोलिसांची दिशाभूल केली.

व्हिडिओ कॉलवरुन संशयितांना ओळखले !

पुर्णपणे भाजलेल्या अवस्थेत असलेल्या भूषणने सांगितलेल्या वर्णनानुसार एलसीबीसह चोपडा पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, रुग्णालयात असलेल्या भूषणला त्यांनी व्हीडीओ कॉलद्वारे संशयितांना दाखविले असता, त्याने यांनीच आपल्याला जाळल्याचे सांगितले होते.

सीसीटीव्ही फुटेजमूळे खरी माहिती आली समोर !
सुरुवातीला भूषणने तो दिवसभरत फिरलेल्या ठिकाणांची त्याने माहिती दिली. यात त्याने आपल्याला भावाने पाठविलेले पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो, त्यानंतर एटीएममध्ये देखील गेलो असे सांगितले. पोलिसांनी हॉटेल, स्टेट बँक, एटीएम व पेट्रोलपंप याठिकाणावरील फुटेज ताब्यात घेतले. यापैकी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो स्वतः च बाटलीत पेट्रोल घेत असल्याचे कैद झाल्याचे दिसून येताच त्याने स्वतःच पेटून घेतल्याची खात्री पोलिसांना झाल्यानंतर संपुर्ण घटनेचा उलगडा झाला.

….अन् पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्वास
जिल्हा रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या भूषणची पोलीस चौकशी करत होते. त्यावेळी तो पोलिसांना घटनेबाबत वेगवेगळे जबाब देत होता. परंतु त्याच्या जबाबातील तफावतीमुळे पोलिसांना देखील या घटनेबाबत थेट निष्कर्ष काढू शकत नव्हते. अखेर पोलिसांनी भूषणला सहानुभूती आणि विश्वास घेत त्याची पुन्हा चौकशी केली. यामध्ये त्याने पोलिसांना सत्य हकीकत सांगत आपणच स्वतःला जाळून घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे भूषणने मृत्यूपूर्वी दिलेल्या कबुली जबाबामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

चोपडा-धरणगाव रस्त्यावर भीषण अपघात ; दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फसवणूकीच्या आरोपाखाली महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

June 8, 2021

भारताचा कम्युनिस्ट पक्षाचा (मार्क्सवादी) महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना पाठिंबा !

May 5, 2024

IRCTC ने बदलले ऑनलाइन तिकीट बुकिंगचे नियम ; जाणून घ्या…काय झाले बदल !

May 12, 2022

टीईटी घोटाळा : परीक्षेत अपात्र ठरलेल्या तब्बल ७८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन केलं पास !

January 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group