TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अहिरे-उखळवाडी रस्त्याच्या धरणी नाल्यावरील पुलाचे काम लवकरच सुरु होणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

खर्दे येथे पेव्हिंग ब्लॉक व पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकासकामांमध्ये कुणीही राजकारण आणू नका. गावात एकोप्याने कामे करा. पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करून ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांनी गावाची तहान भागवा. उखळवाडी ते अहिरे या गावांच्या दरम्यान धरणी पुलासाठी तब्बल ४.५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेल्या पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू करणार आहे. गावासाठी ( जय गुरुदेव भक्तांसाठी) सामाजिक सभागृह व अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम मंजूर करणार असल्याचे प्रतिपादन केले. धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे ६८ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका प्रमुख गजानन पाटील हे होते.

यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या कार्य कर्तुत्वामुळे राज्यभर प्रसिद्ध असल्याने त्यांचा अभिमान वाटतो. गावकऱ्यानी गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाचा उपयोग गावाविकासाठी करून घ्यावा. असे मत व्यक्त केले.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत, वि.का. सोसायटी व ग्रामस्थामार्फत शाल, श्रीफळ व बुके देवून करण्यात आला. यावेळी सरपंच कैलास पाटील यांनी जय गुरुदेव भक्तांसाठी व गावाच्या लहान – मोठ्या कार्यक्रमासाठी डोण पद्धतीचे सामाजिक सभागृह व ग्रामपंचायत जीर्ण झाल्यामुळे डीपीडीसी मधून ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम मंजूर करण्याची मागणी केली . पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदरची मागणी लवकरच मंजूर करणार असल्याची घोषणा केली. यावेळी ६ लक्ष निधी खर्च करून गावदरवाज्यापासून ते गाव अंतर्गत रस्त्यावर बसविण्यात आलेल्या पेव्हिग ब्लॉकचे लोकार्पण व ६८ लक्ष निधी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पाणीपुरवठा योजनेत याचा आहे समावेश

जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी ३ किमी अंतरावरील नारणे गावाजवळ पाण्याचा स्रोत म्हणून बोअरवेल, ३ किमीची पाईपलाईन , ५३ हजार लिटरची क्षमता असलेली पाण्याची टाकी ( जलकुंभ) , २.५ किमीची गाव अंतर्गत पाईपलाईन, पंप हाउस, वीज कनेक्शनसह पंपिंग मशीन आदी बाबींचा या पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे. या योजनेसाठी एकूण ६७ लक्ष ७२ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला असून गावाला पुढील ३० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून योजना मंजूर करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद गटनेते विश्वनाथ पाटील यांनी केले. तर आभार सरपंच कैलास पाटील यांनी मानले. या प्रसंगी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, तालुका प्रमुख गजानन पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील, उपतालुका प्रमुख मोतीलाल पाटील, खर्दे सरपंच कैलास पाटील, उपसरपंच मनीषाताई कोळी, धानोरा सरपंच भगवान महाजन, सुदर्शन पाटील, गटनेते पप्पू भावे, विलास महाजन, प्रशांत देशमुख , पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता आर. पी. वानखेडे ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर कोळी, समाधान कोळी, सुभाबाई भिल, प्रवीण भिल,ज्ञानेश्वर वाघ, संदीप पाटील, वि.का. सोसायटीचे चेअरमन भाईदास कोळी, भिला वाघ यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चलो बुलावा आया है’ फेम गायक नरेंद्र चंचल यांचं निधन

January 22, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १८ जानेवारी २०२३ !

January 18, 2023

शायर मूनव्वर राणाचे वादग्रस्त वक्तव्य : जळगावात संतप्त प्रतिक्रिया

August 20, 2021

गिरीश महाजनांना पैशांची घमेंड, त्याच्याच बळावर फोडाफोडीचे राजकारण करतात : आ. रोहित पवार

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group