TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी गोदाम उभारणीस सर्वतोपरी मदत : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते म्हसावद व चिंचोली येथे शासकीय भरड धान्य खरेदीस प्रारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2022
in कृषी, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासन हमी भावाने धान्य खरेदी करत असल्याने शेतकर्‍यांना वाजवी दर मिळून त्यांना लाभ होत आहे. तर धान्य दीर्घ काळापर्यंत सुरक्षित टिकवण्यासाठी गोदाम आवश्यक असून म्हसावद येथे गोदामाच्या बांधकामासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील म्हसावद येथे शेतकी संघातर्फे शासकीय भरडधान्य योजनेचा शुभारंभ करतांना बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शेतकी संघाने धान्य खरेदीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उत्तम भाव देतांनाच संस्थात्मक पातळीवर नफा मिळवल्याबद्दल कौतुक केले. तर यानंतर चिंचोली येथे कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान्य खरेदीचा शुभारंभ पालकमंत्र्यांनी केला. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते काटा पूजन करून पहिल्यांदा माल आणलेल्या शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेस आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते म्हसावद आणि चिंचोली येथे शुभारंभ करण्यात आला. यात म्हसावद येथे तालुका शेतकी संघातर्फे धान्य खरेदी सुरू करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नामदेव पाटील, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जि.प. सदस्य पवन सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, शिवसेना उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, शेतकी संघाचे चेअरमन अजबराव पाटील, संचालक विजय सोनवणे, पंचायत समिती उपसभापती यांचे पती समाधान चिंचोरे,  सरपंच गोविंद पवार, रोहयो योजना तालुका अध्यक्ष रवींद्र कापडणे, किशोर चिंचोरे, अनिल भोळे, सचिन पाटील, नारायण चव्हाण, महेंद्र पाटील, मधुकर चव्हाण, हौसीलाल परदेशी, परिसरातील सरपंच शिरीष जाधव, डॉ. सुधाकर पाटील, निंबा ठाकरे, विष्णू आप्पा चिंचोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. तर शासकीय खरेदीसाठी सर्वप्रथम माल आणलेल्या बिलवाडी येथील भगवान पाटील या शेतकर्‍याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने म्हसावद येथे शासकीय धान्य खरेदी केंद्राला गेल्या वर्षी परवानगी मिळाली होती. या वर्षभरात केंद्रावर मका ४ हजार ६६ क्विंटल, ज्वारी ४७१२ क्विंटल; गहू १४ आणि हरबरा ८ हजार २० क्विंटल इतकी खरेदी करण्यात आली. खरीप आणि रब्बी हंगामातील या खरेदीमुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या कृषी मालास वाजवी भाव मिळाला. यासोबत शेतकी संघाला ५ लाख ६२ हजार इतका नफा राहिला. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी भाऊंचा हृद्य सत्कार केला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या धान्य खरेदीचा परिसरातील शेतकर्‍यांना लाभ होण्यासाठी म्हसावद येथे शेतकी संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्राच्या यशस्वी वाटचालीबद्दल संचालकांचे कौतुक केले. शेतकी संघाने आता गोडाऊन उभारणीचे प्रयत्न सुरू केले असून यासाठी आपली सर्वतोपरी मदत राहणार आहे. यासाठीचा प्रस्ताव संघाने तातडीने सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. तर म्हसावद येथील तब्बल ३० कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या पुलाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. तर म्हसावदकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी आधीची योजना समाप्त करून नवीन 5योजना मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षता समिती सदस्य अर्जुन पाटील यांनी केले. तर आभार शेतकी संघाचे मॅनेजर दीपक पाटील यांनी मानले.

यानंतर चिंचोली येथे कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान्य खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नामदेव पाटील, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जि.प. सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषी औद्योगीक सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन शैलजाताई निकम, व्हाईस चेअरमन संजय पाटील, संचालक रामभाऊ पाटील, रोहित निकम, रमेशआप्पा पाटील, शांताराम सोनवणे, वसंत साबळे, वाल्मिक पाटील, नाना पाटील, पंस. सभापती यांचे पती जनाआप्पा कोळी, मॅनेजर विश्‍वनाथ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #gulabrav_patil

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

एक्सक्ल्युझिव्ह : वाचा...'मविप्र'वाद प्रकरणी अ‍ॅड. विजय पाटील यांनी दिलेली संपूर्ण फिर्याद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं : रावसाहेब दानवे

March 20, 2022

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित

September 15, 2021

विरोधी पक्षनेते फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यावर धडकतात यास काय म्हणावे? : शिवसेना

April 19, 2021

बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबा निघाले शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शनाला !

December 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group