TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
June 26, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज त्यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही कालच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं.

१०० कोटींच्या वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते. पुन्हा ईडीने छापे टाकल्याने देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. ज्यावेळी याबाबत चर्चा सुरु होती, तेव्हा त्या खोलीत अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे देखील उपस्थित होते.

अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील घरांवर ईडीचा छापा

ईडीने काल (२५ जून) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर छापा टाकून झाडाझडती केली. PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील जीपीओ चौक परिसरातील निवासस्थानी तसंच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागवून अगदी एक एक ड्रॉवर तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथून देशमुख वरळीच्या घरी पोहोचले. वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे जबाब घेतले.

ईडीच्या कारवाईनंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया

“परमबीर सिंग आयुक्त असताना प्रामुख्याने मुकेश अंबांनींच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्यात आलं. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. त्यात एपीआय सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे, प्रकाश धुमाळ, सुनील माने असे पाच पोलीस हे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सीआययू विभागात कामाला होते. ते सगळे परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. शासनाला माहिती मिळाली की हे सगळे या प्रकरणात गुंतले आहेत, तेव्हा परमबीर सिंग यांची आयुक्त म्हणून भूमिका संशयास्पद होती”, असं देशमुख यावेळी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनचे चाक घसरले ; कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण !

July 29, 2024

१९व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे शानदार उद्घाटन

January 2, 2021

नातीसोबत फिरत महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगळसूत्र नेले चोरुन

November 6, 2025

धरणगाव पं. स. च्या गृहनिर्माण अभियंत्याला १० हजारांची लाच घेतांना पकडले !

December 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group