धरणगाव (प्रतिनिधी) श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या इमारतीत कै. बाळकृष्णसेठ भाटिया सभागृहात ३० वी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली.
या सभेत अगोदर श्री बालाजी महाराज प्रतिमेचे पूजन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, सतिषशेठ आसर व ज्ञानेश्वर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामूहिक श्रद्धांजली अर्पण आली. सभेत संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र महाजन यांनी सभेपुढे सर्व विषय वाचून दाखवले व ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. संस्था दरवर्षी संस्थेचे सभासद व सर्वसाधारण सभासद अपघाती विमा काढत असते. यावर्षी संस्थेच्या सर्व साधारण सभासद कै.सागर नाना पाटील यांच्या अपघाती दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यांच्या परिवारास २ लाखाचा धनादेश श्री बालाजी पतसंस्था व दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतर्फे देण्यात आला. तसेच सभासद सभासदांना या वर्षी ७ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
संस्थेकडून मोफत लॉकर सुविधा उलब्ध करून दिली जाते. तसेच गरजू पेशंटसाठी वाकर्स मेडिकल बीडची व्हीलचीयर सुविधा नाममात्र शुल्क आकारून देण्यात येत असते. कोरोना काळात शहरातील गरीब लोकांना किराणा कीट देऊन मदत करण्यात आली. संस्थेतर्फे लाईट बिल भरणा केंद्र, सभासद व हितचिंतक ठेवीदार गरजा पूर्ण करून सुविधा देत आहे. संस्थेचे सभेत संस्थेचे चेअरमन मंगलदास बाळकृष्ण भटिया, व्हा चेअरमन सुरेश ओस्तवाल, प्रकाश सोनवणे, कैलास लोहार, रामकृष्णभाई महाजन, विजय शेट सोनार, किशोर शेठ काबरा व संचालक मंडळ उपस्थित होते. सभासदांच्या संस्थेच्या हॉ चेअरमन सुरेश ओस्तवाल यांनी आभार मानले.
















