जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर मतदार संघाची अंतिम मतदार यादी दि. १५ जानेवारी, २०२१ रोजी प्रसिद्ध झाली आहे. जळगाव शहर मतदार यादीत नाव आहे, परंतु छायाचित्र नाही असे एकूण ३८०४ मतदार आहेत. या मतदारांना बीएलओ यांनी वेळोवेळी संपर्क साधूनही त्यांनी अद्याप फोटो जमा केलेले नाहीत.
अशा मतदारांना अंतीमरीत्या सूचित करण्यात येते की, मतदार यादीत आपले नाव व फोटो आहे किंवा नाही याबाबत खातरजमा करण्यासाठी www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर आपले नावाची खात्री करुन २७ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत आपले फोटो BLO यांचेकडे अथवा तहसील कार्यालयात जमा करावे. ज्या मतदारांचे फोटो प्राप्त होणार नाहीत, अशी नावे कटाक्षाणे वगळली जाणार आहेत. नाव वगळले गेल्यास पुनश्च: फॉर्म नं. ६ भरुन नाव नोंदणी करता येईल. असे मतदार नोंदणी अधिकारी, १३ जळगाव शहर विधानसभा मतदार संघ, तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.