चाळीसगाव (प्रतिनिधी) जैन समाजात अध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री ऑल इंडिया श्वेतांबर जैन कॉन्फरन्स या संघटनेच्या जीवन प्रकाश महाराष्ट्र प्रदेश चतुर्थ झोन अध्यक्षपदी चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्तीपत्र त्यांना या संघटनेमार्फत प्राप्त झाले आहे.
या संघटनेमार्फत समाजातील होतकरू गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे उच्च शिक्षण व व्यवस्था व्हावी यासाठी तसेच समाजातील गरजवंत कष्टकरी व्यापारी यांना मदतीचा हात दिला जावा हे कार्य करण्यात येते जैन समाजातील अग्रगण्य असलेल्या या संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.