TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जवखेडेसीमसाठी दीड कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांचे परिसरात जल्लोषात स्वागत ; जुन्या आठवणींमध्ये रमले गुलाबभाऊ !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडेसीम गावासाठी तब्बल दीड कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. खडकेसीम आणि जवखेडासीम या परिसरात ना. गुलाबराव पाटील यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर आपल्या जुन्या मतदारसंघातील जनतेचे पंधरा वर्षानंतरही प्रेम कायम असल्याचे पाहून ना. गुलाबराव पाटील हे जुन्या आठवणीत रमल्याचे दिसून आले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचा जुना मतदारसंघ असणार्‍या खडकेसीम आणि जवखेडेसीम या गावांना भेटी दिल्या. येथील ग्रामस्थांनी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी जवखेडेसीम येथील ग्रामस्थांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. याप्रसंगी सरपंचांनी मनोगत व्यक्त करतांना ग्रामस्थांचे व विशेष करून गावातील महिलांचे पिण्याच्या पाण्यासाठी खूप हाल होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी महिलांना अश्रू अनावर झाले होते. गावकर्‍यांची ही समस्या ऐकून ना. गुलाबराव पाटील यांनी जवखेडेसीम गावासाठी दीड कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्याची घोषणा केली. या योजनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याची ग्वाही देखील दिली. उपस्थित ग्रामस्थांनी या घोषणेचे टाळ्यांच्या कडकटाटात स्वागत केले.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जवखेडेसीम हे एरंडोल तालुक्यातील असून हा माझा जुना मतदारसंघ आहे. पंधरा वर्षे होऊनही येथील लोक मला विसरले नाहीत ही बाब विलक्षण आहे. जनतेच्या प्रेमाचे आमचे नाते अतूट असून यातूनच आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते. प्रेमाचे हे नाते भविष्यातही कायम राहिल. जवखेडेसीम गावासाठी पाणी पुरवठा योजनेसोबत व्यायामशाळा देखील मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या कामाचे झाले भूमीपुजन !

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जवखेडे सिम येथिल जि प शाळेच्या परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे, मागासवर्गीय वस्तीत भूमिगत गटार बांधकाम ,पुरातन ऐतिहासिक वास्तू चिरेबंदीच्या परिसरात संरक्षण भिंतीचे काम, गाव अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे इ. ठिकाणी भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडून क्रियाशील पालकमंत्री म्हणून गौरव केला.

सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रविंद्र लांडगे यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच दिनेश आम्ले पाटील यांनी गावाची पाण्याची समस्या असल्याने सोडविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना साकडे घातले.

यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील,जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, महिला जिल्हा संघटक महानंदा ताई पाटील, प्रांताधिकारी विनायकुमार गोसावी, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, जि प सदस्य नाना महाजन, सुनील पाटील, ग्रा प सदस्य छगन सोनवणे, माधवराव पाटील, गोपीचंद पाटील, सुभाष पाटील, मंगलसिंग चव्हाण, मनिष चौधरी यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. इयत्ता चौथीतील संकेत पाटील या विद्यार्थ्यांने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : अशी आहे पुर्वनियोजीत कटाची रुपरेषा ; जाणून घ्या...संशयितांची गुन्ह्यातील भूमिका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

February 18, 2021

अनावधानाने फिनाईलच्या पाण्याने केल्या गुळण्या, धरणगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू !

May 22, 2024

जळगावात जयश्री महाजन निश्चितच घडवणार इतिहास ; समर्थकांचे विश्वासदर्शक उद्गार

November 11, 2024

छी..थू…नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार ; रावेर पोलिसात गुन्हा !

May 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group