धरणगाव (प्रतिनिधी) हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या वादातून एकाला मारहाण करीत चाकू सारख्या धारदार वार केल्याची घटना तालुक्यातील विहीर फाट्याजवळील हॉटेल अंजनी गार्डन येथे घडली होती. या प्रकरणी चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संदीप सुभाष नन्नवरे (कोळी) (वय ३६ धंदा मंडप दुकान, रा सोनवद ता धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २५ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते आपल्या मित्रांसह विहीर फाट्याजवळील हॉटेल अंजनी गार्डन येथे जेवणासाठी गेले होते. दुपारी साधारण साडेचार वाजेच्या सुमारास रावसाहब कैलास सपकाळे याच्या हाताचा धक्का लागला. त्यावर संदीप नन्नवरे म्हणाले की, भाऊ थोडा सावकाश चला, असे बोलल्याचा राग आल्याने १) रावसाहब कैलास सपकाळे २) सुभाष धनसिग सपकाळे, ३) मोहित रविंद्र कोळी (सर्व रा. रा निमखेडा ता धरणगाव) तसेच मयुर सपकाळे (रा.झुरगुरखेडा ता धरणगाव) यांनी चापटा-बुक्यांनी, पोटावर पाठीवर मारहाण केली. तसेच तिघांनी हातपाय पकडुन ठेवले. तसेच चाकू सारखे दिसणारे हत्यार काढून संदीप नन्नवरे यांच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर मारुन मारहाण करुन दुखापत केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. जितेंद्र भदाणे हे करीत आहेत.