धरणगाव (प्रतिनिधी) इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्या नूपुर शर्मा यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी धरणगाव शहर मुस्लिम समाजाने आज धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरले. यामुळे संपूर्ण जगातील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे नुपुर शर्मा यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना नगरसेवक अहेमद खा पठाण, माजी नगरसेवक हाजी इब्राहीम, माजी नगरसेवक राजू शेख, नईम काजी, फारूक शेख, जमशेर पठाण, शेफोदिन शेख, खालिद मोमीन, मोईन मोमीन, नगर मोमीन, रिझवान बागवान, करीम खान, फकरूदिन मोमीन यांच्यासह इतर समाज बांधव उपस्थित होते.