TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाबो… रुग्णालयात बुरखा घालून फिरणारी ‘आयशा निघाली जावेद’ ;चौकशीनंतर पोलिसांनाही हसू आवरेना !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) एक संशयास्पद व्यक्ती बुरखा व त्यावर अॅप्रॉन घालून स्वतःला महिला डॉक्टर असल्याचे भासवून संशयास्पदरित्या फिरत होता. परंतू महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाने पकडले असता ती महिला नसून पुरुष असल्याचे आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. जावेद शफी शेख (वय २५, रा. मोठा ताजबाग, दिघोरी), असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, पोलीस चौकशीत पुरुषांबद्दलच्या आकर्षणामुळे त्याने महिलेचा वेश धारण केल्याचे समोर आले. जावेदच्या मोबाईलमधील एका नंबरवर फोन लावल्यावर तर पोलिसांनाही हसू आवरले जात नव्हते.

नेमकं काय घडलं !
गेल्या पंधरा दिवसांपासून एक व्यक्ती बुरखा आणि त्यावर डॉक्टरचा अॅप्रॉन घालून फिरत होता. विशेष म्हणजे, बुरखा घातल्यानंतर तो स्वतः चेहराही झाकून घेत होता. मेयोतील एकही शिक्षण घेणारे डॉक्टर किंवा इतर कर्मचारी हे बुरखा घातल्यानंतर चेहरा झाकत नसल्यामुळे एमएसएफच्या जवानांना संशय येत होता. बुधवार, १४ जून रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या एमएसएफ जवानाला बुरखा व त्यावर अॅप्रॉन घालून चेहरा झाकलेली महिला दिसली. त्यांनी तिला अडविले. सुरक्षारक्षकाने रुग्णालयाच्या आयकार्डबाबत विचारणा केली असता ती उत्तर देत नसल्याचे लक्षात येताच महिला सुरक्षारक्षकाला बोलाविण्यात आले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

बाईचा आवाज काढण्याचा प्रयत्नामुळे संशय बळावला !

बुरखा घातलेल्या व्यक्तीला बोलते करण्याचा प्रयत्न करीत असताना तिने बाईचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला सुरक्षारक्षकांचा संशय आणखीनच बळावला. त्यांनी तिचा बुरखा काढण्याचा प्रयत्न केला असता तिने नकार दिला. इतक्या मोठ्या लोकांसमोर बुरखा काढणार नसल्याचे तिने सांगितले. शेवटी महिला सुरक्षारक्षकाने तिला एका स्वतंत्र खोलीत नेऊन बुरखा काढण्यास सांगितले. तिने बुरखा काढताच आत दाढी-मिशी असलेला व्यक्ती दिसताच महिला सुरक्षारक्षक अवाक् झाली. त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव जावेद शफी शेख, असे सांगितले.

पुरुषांबद्दलच्या आकर्षणामुळे रिकामे उद्योग !
सुरक्षारक्षकांनी याची माहिती तहसील पोलिसांना दिली. पोलिसांनी मेयो गाठून त्याला ताब्यात घेतले. आरोपीचे लग्न झाले असून गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी प्रकृती बरी नसल्याने मेयोमध्ये भरती होती. त्यावेळी तो नियमित तिला भेटण्यासाठी येत होता. तिची प्रकृती ठणठणीत होऊन तिला रुग्णालयातून सुटी झाली. त्यानंतर ती आरामाकरिता माहेरी गेली. अशा परिस्थितीत तो पत्नीचे कपडे घालून मेयोमध्ये फिरत होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. असे का करतो? असे विचारल्यावर त्याने पुरुषांबद्दलच्या आकर्षणामुळे रुग्णालयात फिरत असल्याचे आणि रुग्णांच्या पुरुष नातेवाइकांचे मोबाइल क्रमांक घेत असल्याचे सांगितले.

‘माय लव्ह’चा आवाज ऐकून पोलिसही हसले
सुरुवातीला जावेदच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही. त्यामुळेच त्याचा मोबाईल तपासण्यात आला. मोबाईलमध्ये ‘माय लव्ह’ नावाने एक नंबर सेव्ह केलेला होता. फोन लावल्यावर पोलिसांना वाटले की समोरून एखादं महिलेचा आवाज येईल, मात्र समोरून एका पुरुषाचा आवाज आला. फोन घेणार्‍या व्यक्तीने सांगितले की, तो जावेदला महिला समजून त्याच्याशी प्रेमाने गप्पा मारत होता, हे ऐकून पोलिसांनाही हसू आवरले जात नव्हते. जावेदजवळ पोलिसांना 3 मोबाईल सापडले असून त्याने ते मोबाईल चोरल्याचा संशय आहे. तिन्ही क्रमांकांची चौकशी सुरू आहे.

महिला वापरतात असलेल्या वस्तू आढळल्या !
जावेदला पुरुषांचे आकर्षण आहे. याच कारणावरून तो रुग्णालयाच्या आवारात महिलेच्या रुपात फिरत होता. त्याची झडती घेतली असता, ज्या वस्तू महिला वापरतात त्याच्याकडे त्या वस्तू आढळून आल्या. पुरुषांबद्दलच्या आकर्षणामुळे आरोपीने महिलेचा पोशाख धारण केल्याची बाब तपासात समोर आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी शेत तेथे तृणधान्य संकल्पनेतंर्गत मिनीकिटचे होणार वितरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : धरणगाव पं.स. विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !

August 30, 2021

एसीबीची कारवाई ! तीन लाखांची लाच घेताना अभियंत्याला केली अटक

May 1, 2022

विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने बसला आग; ६ प्रवाशांचा मृत्यू

January 17, 2021

ब्रेकिंग न्यूज : बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ; न्यायालयाने विरोधातील याचिका फेटाळली ; ठाकरे सरकारला मोठा दिलासा !

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group