धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात बांभोरी बु. ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकविला आहे. यावेळी उपसरपंचपदी सरला राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून नरेश प्रकाश पाटील, सुरेखा हिरामण पाटील, गोपीचंद सुखदेव सोनवणे, ज्योतीबाई अनिल माळी, सुनंदा धनराज पाटील यांची निवड झाली. यावेळी समस्त बांभोरी गावातील तरुण मित्र – परीवार व ग्रामस्थांच्यावतीने विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.