TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सासरच्या मंडळीकडून बेदम मारहाण, जखमी जावयाचा उपचारादरम्यान मृत्यू !

सासूसह साडूला अटक ; अन्य संशयित आरोपी फरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) आंबेलोहळ येथे चार दिवसांपूर्वी घरगुती कारणावरून झालेल्या भांडणामध्ये जखमी जावयाचा बुधवारी (दि. १२) रात्री ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. अनिल पिंपळे (रा. आंबेलोहळ) असे मृत जावयाचे नाव आहे. याप्रकरणी ७ जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

अनिल पिंपळे यांचा पत्नी गीता पिंपळेसोबत रविवारी (दि. ९) सकाळी घरगुती कारणावरून वाद झाल्याने तिने ही माहिती माहेरच्या मंडळीना दिली. जावई सतत मुलीला त्रास देत असल्याने गीताचे वडील संजय चव्हाण, आई पारूबाई चव्हाण, भाऊ कृष्णा चव्हाण, बहिणीचा पती करण पवार यांनी रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आंबेलोहळ गाठले. जावई अनिल यास मेहुणा कृष्णा चव्हाण याने शिवीगाळ करीत लाकडी दांड्याने मारहाण केली तर साडू करण पवार याने चाकूने अनिलच्या डोक्यात व उजव्या पायावर वार करून जखमी केले होते. अनिल हा सासूसह गंभीर जखमी झाल्याने त्यास नातेवाईकांनी घाटीत उपचारार्थ दाखल केले होते.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

या घटनेनंतर अनिलच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री अनिलची सासरवाडी एकलहेरा येथे जाऊन त्याचा सासरा संजय चव्हाण व मेहुणा कृष्णा चव्हाण यांना बेदम मारहाण करुन जखमी केले होते. दरम्यान, सासरच्या मंडळीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अनिल पिंपळे याच्यावर चार दिवसांपासून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अनिलची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी सासरा संजय चव्हाण, सासु पारुबाई चव्हाण, मेहुणा कृष्णा चव्हाण व साडू भाऊ करण पवार (सर्व रा. एकलेहरा) यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पारुबाई चव्हाण व साडुभाऊ करण पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात सहभागी अनिलचा सासरा संजय चव्हाण व मेहुणा कृष्णा चव्हाण हे अनिलच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जखमी असल्याने त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान नातेवाईकांनी अनिलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने घाटीत काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत त्यांची समजूत काढली. प्रकरणात इतर आरोपी फरार असून पुढील तपास उपनिरीक्षक सचिन पागोटे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

संतापजनक : पंचायत समितीच्या विषयतज्ज्ञाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वित्झर्लंडच्या अॅडॅप्ट्रिसिटी एजीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना निमंत्रण

May 25, 2022

*योगासना स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विवेक सूर्यवंशी याला सिल्वर मॅडेल*

July 29, 2024

‘ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे’ : रामदास आठवले

November 6, 2021

धक्कादायक : ग्रामपंचायत निवडणुकीत काळाजादूचा प्रकार !

December 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group