TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

सुसाइड नोटमध्ये प्राचार्यांचा उल्लेख; वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
February 17, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मित्र व शिक्षकांसमोर प्राचार्यांनी मारहाण केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्याम प्रभाकर पाटील (वय २०, रा. बोदवड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, ही घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) दौलतनगर येथे घडली. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम पाटील हा गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी त्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर त्याच्या खिशात सुसाइड नोट आढळून आली असून, त्यामध्ये “कुठलीही चूक नसताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांसमोर मारहाण केली,” असा उल्लेख करण्यात आला आहे.

READ ALSO

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागील कारणांबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मयताचे वडील प्रभाकर पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत प्राचार्य योगेश पवार यांनी मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून पोलिसांनी संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शैक्षणिक संस्थांमधील वागणूक आणि शिस्तीच्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांकडून सुसाइड नोट आणि अन्य पुराव्यांच्या आधारे सखोल तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जि.प. शाळांसाठी २६ कोटींचा निधी मंजूर ; गुणवत्तापूर्ण काम करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश !

July 30, 2023

वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज : डॉ. सोमनाथ वडनेरे

July 24, 2021

Gold Price Today : सोन्याचे दर ५० हजारांच्या खाली तर चांदीही स्वस्त ; जाणून घ्या…आजचा भाव

April 20, 2022

वीजहानी कमी करण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर !

August 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group