जळगाव (प्रतिनिधी) महावितरणचे सर्व ग्राहकांना आवाहन आहे की त्यांनी प्रसारित होणाऱ्या फसव्या संदेशांना बळी पडू नये. अनोळखी नंबरवरून आलेले अशा फसव्या कॉल्स किंवा मेसेजेसला अटेंड करू नका किंवा त्या एसएमएस/व्हॉट्सॲप/ईमेलमध्ये तुम्हाला प्राप्त होणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
महावितरण नेहमी VMMSEDCL, VKMSEDCL इत्यादी प्रेषक ID वरून ग्राहकांना एसएमएस पाठवते. महावितरण ग्राहकांना कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास किंवा मोबाईल/कॉम्प्युटरवर Anydesk सारखे कोणतेही सॉफ्टवेअर स्थापित करण्यास सांगत नाही. असे संदेश मिळाल्यावर ‘customercare@mahadiscom.in’ या ईमेलवर कळवा. कोणत्याही माहितीसाठी महावितरणच्या ग्राहक पोर्टलला भेट द्या. केवळ महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आणि ग्राहक पोर्टल अथवा मोबाईल ॲप वरून अधिकृत ऑनलाइन पेमेंट गेट वे च्या माध्यमातूनच विज बिल भरावे. सर्व ग्राहकांनी आपले थकित बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.