TheClearNews.Com
Monday, December 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यात सुनील झंवरला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in क्रीडा, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरला मुंबई हायकोर्टाने गुरुवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. झंवरकडून अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला होता.

 

READ ALSO

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहाराच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने अॉक्टोंबर फेटाळून लावला आहे होता. त्यानंतर झंवरने मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. दरम्यान, याआधी २० ऑक्टोंबरला डेक्कनच्या गुन्ह्यात झंवरचा नियमित जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळून लावला होता. परंतू आता शिक्रापूरच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती अॅड. अनिकेत निकम यांनी दिली आहे. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यात अडकल्यापासून अनेक दिवसानंतर झंवरला पहिल्यांदा गुरुवारी थोडा दिलासा मिळाला आहे. परंतू डेक्कनच्या गुन्ह्याती झंवर अद्यापही येरवडा कारागृहातच आहे.

 

अॅड. अनिकेत निकम यांनी आपला युक्तिवाद करतांना न्यायालयासमोर काही महत्वाचे मुद्दे मांडले. त्यानुसार एकाच गुन्ह्याची तीन ठिकाणी फिर्याद देण्यात आली असून ते चुकीचे आहे. तसेच कायद्याला धरून नाहीय. शिक्रापूरच्या गुन्ह्यात ऐकीव माहितीवरून आरोप लावण्यात आलेले आहेत. परंतू ऐकीव माहितीवर आधारित आरोपांमध्ये तथ्य नसते. त्यामुळे अटक करणे कारवाई योग्य होत नाही. गुन्ह्याचा संबंध जळगावशी असतांना देखील गुन्हे मुद्दाम पुण्यात दाखल करण्यात आले. जेणे करून यातील आरोपींना त्रास झाला पाहिजे, असेही अॅड. निकम यांनी म्हटले. दरम्यान, याप्रकरणी आता २० डिसेंबरला पुढील सुनवाई होणार आहे.

 

शिक्रापूरच्या फिर्यादीत काय म्हटले होते?

 

संतोष काशिनाथ कांबळे (वय ५७, रा. लोहगाव, पुणे) यांनी फिर्यादीत म्हटले होते की, ते सुरक्षारक्षकाची नाेकरी करतात तर त्यांचे वडील काशिनाथ भगवान कांबळे हे सन १९९० मध्ये शिक्षक पदावरुन निवृत्त झाले आहेत. दरम्यान, सन २०१४ मध्ये कांबळे कुटंुबियांनी बीएचआर पतसंस्थेच्या संदर्भात आकर्षक व्याज देणारी जाहिरात एका वृत्तपत्रात पाहिली होती. संतोष कांबळे यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांनी वडीलांसोबत चर्चा करुन जवळ असलेला पैसा बीएचआरमध्ये ठेऊन त्याच्या व्याजावर घरखर्च करण्याची बोलणी केली. त्यानुसार काशिनाथ कांबळे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांनी पुण्यातील बीएचआरच्या भिमा कोरेगाव व शिक्रापुर या दोन्ही शाखांमध्ये विविध योजनांतर्गत वर्षभरासाठी पैसे ठेवेल. नंतर पुन्हा मुदत वाढवली. त्यांच्या ठेवींच्या बदल्यात दोन्ही शाखांनी मिळुन १८ लाख ७ हजार १५९ रुपये त्यांना देय होते. परंतू, मुदत संपल्यानंतरही कांबळे यांना पैसे परत मिळाले नाही.

 

तुम्हाला फक्त २० टक्के रक्कम मिळेल

 

कांबळे सन २०१५मध्ये दोन्ही शाखांमध्ये गेले असता शाखा बंद पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे संतोष कांबळे हे वडीलांसह जळगावातील एमआयडीसी मख्य शाखेत आले. त्या ठीकाणी त्यांना अवसायक जितेंद्र कंडारे भेटला. त्याने सांगितले की, पतसंस्था बुडाली असून आता माझी अवसायक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. आम्ही कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांच्या फक्त १५ ते २० टक्के रक्कम देत आहोत. बाकीची रक्कम बुडणार आहे. आमचे लोक तुमच्या घरी येतील, ते सांगतील तसे करा, १०० रुपयांच्या स्टॅम्पवर ते म्हणतील तसे लिहुन देत सह्या करा. यानंतर तुम्हाला २० टक्के रक्कम मिळेल, असे सांगत कंडारेने कांबळे यांच्या ठेवी, घराचा पत्ता, फोन नंबर लिहुन घेतला.

 

कंडारेकडून धक्काबुक्की

 

कांबळे यांनी पुर्ण रक्कम परत मागीतली असता कंडारेने त्यांना शिव्या देऊन बाहेर काढून टाकले. जेवढे भेटतील तेवढे घ्या नाहीतर एक रुपयाही मिळणार नाही असे बोलुन दोघांना धक्काबुक्की करुन बाहेर काढून दिले. यानंतर वेळोवेळी कांबळे हे जळगावात आले परंतू, बीएचआरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कंडारेस भेटु दिले नाही. २० टक्के रक्कम घेऊन पावत्या विका, अन्यथा काहीच मिळणार नाही असेच सर्वजण त्यांना सांगत होते. कंडारेसह त्याच्या साथीदारांनी संस्थेच्या मालमत्ता विक्री केली, खोटे कागदपत्र तयार केले, पावत्या २० टक्के रकमेत खरेदी करुन गैरव्यवहार केला आहे.

 

दलाल नेमल्याची माहिती जळगावातून मिळाली


दलाल नेमुन त्यांच्याकडून राज्यभरातील ठेवीदारांच्या पावत्या २० टक्क्यांनी खरेदी करीत असल्याची माहिती कांबळे यांना जळगावातून मिळाली हाेती. यानंतर सन २०१९ मध्ये कांबळे यांच्या लोहगाव येथील घरी दोन अनोळखी व्यक्ती आले. आम्ही बीएचआर पतसंस्थेचे लोक असून कंडारेंनी पाठवले आहे असा परिचय त्यांनी दिला. यावेळी त्या दोघांनी ३० टक्के रक्कम देण्याचे सांगीतले. परंतू, कांबळे यांनी मान्य केले नाही. दोघांनी कांबळेंना पुन्हा एकदा विचार करा असे सांगत काही ठेवीदारांच्या शपथपत्रांचे नमुने दाखवले. परंतू, पुर्ण रक्कम पाहिजे असल्याने कांबळेंनी दोघांना माघारी पाठवले.

 

मोठा कर्जदार तुम्हाला पैसे देण्यास तयार

 

यानंतर संतोष कांबळे यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये परत एकदा जळगाव गाठुन कंडारेला भेटण्याचा प्रयत्न केला. आता वडील मयत झाले आहेत, आता तरी पैसे द्या. अशी विनवणी त्यांनी केली. परंतू, यावेळी देखील त्यांना २० ते ३० टक्के रक्कम परत मिळेल असेच सांगण्यात आले. तसेच तुम्ही जर पावत्या देणार नाही, तर इतर कोणीही देऊ शकेल. कारण आता मोठा कर्जदार तुम्हाला पैसे देण्यास तयार असल्याचे आमीषही दिले होते. परंतू, कांबळे यांनी नकार दिला. अखेर त्यांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी शिक्रापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

कंडारेकडून सरकारी पदाचा गैरवापर

 

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी प्रकाश वाणी, सुनिल झंवर, महावीर जैन, अजय राठी, विवेक ठाकरे, अजय ललवाणी, उदय कांकरीया व धरम साखला यांच्यावर दाखल झाला गुन्हा झाला होता. दरम्यान, कंडारे याची कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांचे पैसे परत करण्याची जबाबदारी असताना त्याने सुरेश जैन, राजेश जैन व इतर पदाधिकाऱ्यांमार्फत ठेवीदारांकडे माणसे पाठवून ठेवींच्या पावत्या २०-३० टक्के रकमेत प्रतिज्ञापत्रासह लिहुन घेऊन पुढील तक्रार देऊ नये यासाठी सरकारी पदाचा गैरवापर केला. खोटी कागदपत्रे तयार करुन फायद्यासाठी अपहार, फसवणूक केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

December 22, 2025
जळगाव

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025
जळगाव

लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक

December 22, 2025
चाळीसगाव

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

December 21, 2025
गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
Next Post

'त्या' व्यापाऱ्याला लुटणाऱ्या लुटारूंना एलसीबीने केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; बोलावली तातडीची बैठक

November 12, 2020

भयंकर : दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरला विवाह ; पण लग्नाआधीच नवरदेवानं केला तरुणीवर बलात्कार !

February 2, 2022

भुसावळात भूगोल दिवस व मकर संक्रांत उत्साहात साजरी

January 20, 2023

एकच मुलगी अपत्य असणाऱ्या पालक व मुलींचा सत्कार !

June 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group