TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : मुख्य शाखेच्या सर्व्हरमधून कंडारे आणि शहाने डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय !

वाचा...'द क्लिअर न्यूज 'चा एक्सक्ल्युझिव्ह रिपोर्ट !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (Bhr) या पतसंस्थेच्या मुख्य शाखेतील २ हजार टीबीच्या डाटाबेस सर्व्हरमधील (Database Server) तब्बल २६ महत्वपूर्ण शाखांचा डेटा मुख्य संशयित आरोपी तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे व तांत्रिक कामकाज बघारा कुणाल शहा यांनी डिलीट केल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळेच ठेवीदारांना पैसे परत करण्याची प्रक्रिया गती घेत नाहीय. (bhr scam)

२ हजार टीबीच्या सर्व्हरमधून तब्बल २६ शाखांचा डेटा गायब
गैरव्यवहाराचे पुणेपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे गोळा केले होते. त्यात मुख्य शाखेतील २ हजार टीबीच्या सर्व्हरचा समावेश होता. बीएचआर घोटाळ्यात जळगावमधील वेगवेगळ्या १२ ठिकाणी टाकलेल्या धाडीत आर्थिक गुन्हे शाखेला मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे गोळा केले होते. याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीतही अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली होती. परंतू मुख्य शाखेतील २ हजार टीबीच्या सर्व्हरमधून एक-दोन नव्हे तर २६ शाखांचा डेटा आढळून आला नाही. त्यामुळे हा डेटा मुख्य संशयित आरोपी तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे व तांत्रिक कामकाज बघारा कुणाल शहा यांनी डिलीट केल्याचा पोलिसांना संशय आहे. कुणाल शहावर ‘बीएचआर’ची अधिकृत वेबसाईट असतांना बनावट सॉफ्टवेअर तसेच वेबसाईट तयार करून दिल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा डेटा रिकव्हर अर्थात परत मिळविण्यासाठी फोरेन्सिग लॅबकडे सर्व्हर पाठवलेले आहे. फोरेन्सिग लॅब हा डेटा हळू-हळू रिकव्हर करत आहे.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

कुणाल शहाने तयार केले होते बनावट सॉफ्टवेअर आणि वेबसाईट
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात असे निष्पन्न झालेय की, बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्रीसाठी २ अधिकृत वेबसाईट अस्तीत्वात असताना आरोपींतांनी बनावट खाजगी वेबसाईट कुणालाही कळू नये म्हणून अहमदाबादच्या कुणाल शहा या व्यक्तीकडून संगणमताने तयार केली होती. या बनावट वेबसाईटव्दारे सदर संस्थेच्या मालमत्ता विक्री केल्याचा खोटा देखावा निर्माण करून संस्थेच्या करोडो रूपयांच्या मालमत्तेचा विक्रीच्या नावाखाली अपहार केला होता. तर दुसरीकडे आतापर्यंत झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अंदाजे ६५० कर्जखाती एफ.डी. मॅचिंगद्वारे निरंक केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु यापैकी बऱ्याच कर्जदारांच्या कर्ज मागणी अर्ज फाईल व एफ.डी. मॅचिंग झालेल्या फाईल्स कार्यालय झडतीमध्ये मिळुन आलेल्या नाहीत. या सर्व फाईल्स पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असून त्या कोठे दडवुन ठेवल्या आहेत, याबाबत कंडारेकडे सखोल चौकशी करण्यात आली होती.

सर्व्हर/हार्डडिस्क जप्त

कंडारेकडून टेंडर प्रक्रिया राबविण्यासाठी बनविण्यात आलेल्या वेबसाईटचा प्रोग्रॅम कोड व सोर्स कोड जाणुन घेवुन सदर वेबसाईटचा डेटा कोणत्या सर्व्हर / हार्डडिस्कवर सेव्ह केलेला आहे?, याबाबत तपास करुन सदरचा सर्व्हर/हार्डडिस्क जप्त करण्यात आल्या होत्या. सदरची वेबसाईट कोण कोणत्या ठिकाणी लिंक केलेली आहे?. या वेबसाईटला अन्य काही पेमेंट गेट वे आहेत का? व त्याद्वारे पतसंस्थेच्या पैशांचा अपहार झाला आहे का? याबाबतही कंडारेची कसून चौकशी झाली होती. दरम्यान, कंडारे हा फरार असताना त्याने पतसंस्थेतील अधिक दस्तऐवज, हार्डडिस्क वगैरे पुरावा अन्यत्र कोणाकडे लपवून ठेवला असण्याचा किंवा नष्ट केला असण्याची दाट शक्यता पोलिसांनी आधीच व्यक्त केली होती. दरम्यान, आता कंडारे शिक्रापूरच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. तर कुणाल शहाला न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलेले आहे.

…म्हणून पुणे आर्थिक गुन्हे शाखा फोरेसिंग लॅबच्या सतत संपर्कात !
आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या अनेक ‘हार्डडिस्कसमध्येच ठेवीदार, कर्जदार, संस्थेच्या मालमत्ता यासह कंडारे, झंवर यांच्या सर्व व्यवहाराची माहिती होती. चैतन्यकुमार नासरे यांनी बीएचआर पतसंस्थेच्या अवसायक पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांना ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अडचणी येत होत्या. परंतू आता हार्डडिक्ससह इतर संपूर्ण महत्वाचा डाटा पोलिसाकडून अवसायक नासरे यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. त्यामुळे ठेवीदारांना पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतू सर्व्हरमधील डेटा पूर्ण मिळत नाही, तोपर्यंत विद्यमान अवसायक चैतन्यकुमार नासरे यांच्यासमोर अडचणी कायम राहणार आहेत. त्यामुळे पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून डेटा लवकरात लवकर मिळावा म्हणून फोरेसिंग लॅब सतत संपर्क सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Bhr_Scam

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

नेताजींच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तृणमूल-भाजप कार्यकर्ते भिडले ; सुरक्षारक्षकाचा हवेत गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वानखेडे खोटं बोलताहेत ; निकाह लावणाऱ्या काझींचा मोठा खुलासा

October 27, 2021

विधानपरिषद निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दरेकर, महाजन आणि मंगेश चव्हाण लोकलने विरारला !

June 18, 2022

राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

April 14, 2021

गारखेडा येथे घराजवळ काम करताना सर्पदंश झाल्याने तरुणाचा मृत्यू !

September 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group