TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात अतिक्रमण मोहीम ; पोलिस अधिकार्‍यास धक्काबुक्की

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून शहरात अतिक्रमण मोठया प्रमाणात वाढले आहे. यावर आता पालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत रस्त्यालगत असलेली दुकाने तसेच बांधकामावर बुल्डोजर चालविण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी शहरातील खडका चौफुली, जाम मोहल्ला आणि गवळी वाड्यातील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी खडका रोड परिसरात कारवाई वरुन माजी गटनेते मुन्ना तेली यांच्या मुलाने विरोध केला. यावेळी पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

शहरात पालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहीमेच्या दुसऱ्या दिवशी खडका रोड परिसरात अतिक्रमण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते रजा टावर चौक या रस्ता दरम्यान असलेल्या दुकानांचे फलक काढण्यात आले. तसेच काही हातगाडीधारकांनी अतिक्रमण केले होते, त्यांनाही हटविण्यात आले. यानंतर रजा टॉवर ते खडका चौफुली दरम्यान पालिकेचे पथकाने कारवाई सुरू केली.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

महामार्गावर मृत्यूचा थरार

शहरात पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की

यादरम्यान भाजपाचे माजी गटनेते हाजी मुन्ना तेली यांच्या आशा हाईट्स समोर असलेल्या त्यांच्या कार्यालयासमोर पालिकेचे पथक आले असता, नाल्यावर असलेला धापा जेसीबीच्या सहाय्याने काढू लागले. मात्र आशिक तेली यांनी या कारवाईस विरोध केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांनी त्यांची समजूत घातली असता, भोये यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी आशिक तेली यांची धुलाई केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आशिक तेली यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून बाजारपेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामांत अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षकांनी केली पत्रकारास मारहाण

खडका रोड परिसरात अतिक्रमण मोहिमेदरम्यान मुन्ना तेली यांच्या कार्यालयासमोर वाद झाला. यावेळी घटनेचे छायाचित्र काढताना बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पत्रकार ज्ञानेश्वर आमले यांना मारहाण केली. त्यांच्या कानाला दुखापत झाली असून याबाबत त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. यात त्यांनी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला असून गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

दुकानदारांनी स्वतःच काढले अतिक्रमण

खडका रोड परिसरात चहाच्या टपऱ्या, पान टपरी, गॅरेजच्या टपऱ्या, नाश्ता सेंटर, वडापाव विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मात्र पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम राबवली जाणार असल्याची सूचना दिल्याने जास्तीचे नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिकांनी आधीच टपऱ्या हलवल्या तर ज्या व्यावसायीकांनी अतिक्रमण हटवले नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
Next Post

'ज्याचं अक्षर सुंदर, त्याचे विचार सुंदर : पंकज नागपुरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकाच दिवशी भारताच्या दोन ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनानं निधन

May 8, 2021

कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळेंच्या संकल्पातील अपूर्ण कामांची पूर्तता करणार : श्रीराम पाटील !

April 20, 2024

ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना : रोहिणी खडसे

June 26, 2021

लाच घेताना सरपंच पत्नीसह पतीही जाळ्यात ; घरकुल, विहिरीच्या प्रस्तावासाठी पैसे मागितल्याचा आरोप !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group