मुंबई (वृत्तसंस्था) बाजार सुरु होताच सेन्सेक्सची मोठी उसळी दिसून आली. कोरोना लॉकडाऊननंतर प्रथमच एवढी मोठी सेन्सेक्सची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक कल आणि जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यामुळे झालेल्या सकारात्मक परिणामामुळे भारतीय शेअर बाजार ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने पहिल्यांदाचा ५० हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडला.
सेन्सेक्सने २०० पॉइंटसची झेप घेत ५०,१२६.७६ चा टप्पा गाठला भांडवली बाजाराच्या आजवरच्या इतिहासात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ही पातळी गाठली आहे. शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने ५० हजारांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. बाजारात उत्साह दिसून येत आहे. ही बाब गुंतवणूकदारकांसाठी चांगली आहे. अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीनंतर आशियाई बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्सची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी दिसून आली असून सेन्सेक्समध्ये २६८ अंशांची उसळी दिसली. सेन्सेक्स ५०.०६१ अंशांवर पोहोचला. आज भांडवली बाजार उघडल्यानंतर सेन्सक्स आज पहिल्यांदा ५० हजारांच्या स्तरावर उघडला. बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही वाढ दिसून आली. मिडकॅफ इंडेक्समध्ये ०.६२ तर स्मॉलकॅफ इंडेक्समध्ये ०.६० टक्के वाढ झाली. तर निफ्टी निर्देशांक १४ हजार ७०० अंकापर्यंत पोहोचला. दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने ११ जानेवारीला ४९ हजाराचा विक्रमी टप्पा ओलांडला होतो.