धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता घडली होती. दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी अखेर चौकशी अंती रविवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश काशीनाथ सुर्यवंशी (वय ४५ रा. भवरखेडा ता. धरणगाव) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
जगदीश काशीनाथ सुर्यवंशी (वय-४५) हे आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे वास्तव्याला होते. २६ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता जगदीश हे दुचाकी क्रमांक ( जीजे ०५ जीक्यू १६९७ ) ने धरणगाव रेल्वे उड्डाणपूलावरून धरणगाव रेल्वेस्टेशनकडे जात असतांना समोरून येणारी दुचाकी क्रमांक ( एमपी ४६ एमपी ५७८३ )वरील चालक राहूल बारेला रा. फतरीया ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश याने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जगदीश काशीनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशी अंती अखेर रविवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार राहूल बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.