TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जन्मदात्या बापानेच गळा आवळून केला मुलाचा खून ; दगड बांधून मृतदेह फेकला विहिरीत !

२३ दिवसांनतर घटना उघडकीस ; वडील व भाऊविरुद्ध गुन्हा !

vijay waghmare by vijay waghmare
June 2, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) कौटुंबिक वादातून बापाने स्वतःच्या मोठ्या मुलाचा गळा दाबून खून केला. नंतर धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह दगड बांधून बुरुडगाव रस्त्यावरील एकाडे मळ्यातील एका विहिरीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ३१) समोर आला. दि. ८ मे रोजी ही घटना घडली होती. तब्बल २३ दिवसांनी ही घटना पोलीस तपासात स्पष्ट झाली असून, पोलिसांनी मयताचे वडील व भाऊ या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

गणेश अशोक एकाडे (वय ३१, रा. एकाडे मळा) असे मृताचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी त्याचे वडील अशोक लक्ष्मण एकाडे व भाऊ दिनेश अशोक एकाडे या दोघांना ताब्यात घेतले आहे. अशोक एकाडे यांनी दि. १० मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन मुलगा गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. हेडकॉन्स्टेबल विक्रम वाघमारे व अंमलदार डाके याबाबत तपास करीत होते. तपासादरम्यान तक्रारदाराकडून प्रत्येक वेळी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे पोलिसांचा अशोकवर संशय बळावला. त्यादृष्टीने पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता, बापानेच मुलाला मारल्याची गोपनीय माहिती अंमलदार दीपक रोहकले यांना मिळाली. त्यानंतर अशोक व त्यांच्या धाकट्या मुलाला ताब्यात घेत कसून चौकशी केली. दि. ८ मे रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घराच्या गच्चीवर मुलाचा गळा दाबून खून केल्याचे व धाकट्या मुलाच्या मदतीने मृतदेह विहिरीत नेऊन टाकल्याचे तपासात समोर आले. गणेश व त्याच्या वडिलांचे कायम वाद होत होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

READ ALSO

पाठवल्याची अश्लिल व्हिडीओ धमकी देत वृद्धाला ९ लाखांचा गंडा

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

खुनाचा उलगडा होताच पोलिसांनी एकाडे मळ्यातील विहिरीकडे धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक व महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरा गणेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल विक्रम वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अशोक एकाडे व दिनेश एकाडे या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक शीतल मुगडे तपास करीत आहेत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimemurder

Related Posts

गुन्हे

पाठवल्याची अश्लिल व्हिडीओ धमकी देत वृद्धाला ९ लाखांचा गंडा

August 9, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
Next Post

भाच्याने लावला मामीला १६ लाखांचा चुना ; गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर : देवाजी तोफा !

December 27, 2022

विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडी सरकारवर विश्वास दाखविला – जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे

December 4, 2020

जळगावनंतर रावेर मतदार संघातही मोठं धक्कातंत्र ; शरद पवार खेळणार ‘लेवा कार्ड’ !

April 5, 2024

काय सांगताय ! रात्री पोटात वेदना झाल्या ; प्रेग्नन्सीची कोणतही लक्षणं नाही तरी महिलेने दिला बाळाला जन्म

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group