धरणगाव (प्रतिनिधी) भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बन्सी व डॉ. शाह यांच्याशी दवाखान्यातील व औषधींच्या स्टॉक समस्येबाबत चर्चा केली.
यावेळी क्रांतीकारी खाज्याजी नाईक कोविड सेंटर याठिकाणी देखील आ. राजूमामा भोळे यांनी भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष विलास महाजन, समाधान मोरे, अनिल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्याप्रसंगी भाजपचे नेते शिरीषआप्पा बयस, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शेखरदादा पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, शरदअण्णा धनगर, भालचंद्र माळी, विजय महाजन, राजू महाजन, वासुदेव महाजन, जुलाल भोई, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, युवा मोर्चाचे निलेश महाजन, विक्की महाजन, रोहित पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.