TheClearNews.Com
Thursday, April 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात धान्याचा काळा बाजार ; १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने गुरुवारी शहरातील कलम जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य साठा जप्त केला होता. दरम्यान, आता छापा टाकल्यानंतर दोन दिवसांची पंचनामा करून हा सर्व प्रकार रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा उद्देश असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून १२.६३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा रोडवरील कमल जिनींग फॅक्टरीमध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर यांच्या निर्देशाने पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई विशेष पथकाचे सपोनि सचिन पांडुरंग जाधव, पो.ना. प्रमोद मंडलीक, सहा. फौजदार बशीर गुलाब तडवी यांच्या पथकाने केली. यात रेशनचा अवैध साठा आढळून आला असल्याचे दिसून आले होते. यात रेशनच्या मालात भेसळ करून ते अन्यत्र विक्रीसाठी नेले जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले होते. तथापि, याबाबत पूर्ण शहानिशा करण्याचे महसूल प्रशासनाने सूचित केले होते. यानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी पुरवठा निरिक्षक संजय घुले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या धान्याचा पंचनामा केला.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

सादर केलेला करारनामा तपासात दिसून आला

पंचनामा करतांना या जिनींग फॅक्टरीत आढळून आलेले इसम तसेच ट्रक चालकांना विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यात निलेश नामदेव मुसळे (वय.४५ रा. धरीणी चौक, धरणगाव) आणि शेख आमीर शेख बुडन (वय ३२ रा.मलकापुरा, वार्ड नं. २१, दुर्गानगर, ता. मलकापुरा जि.बुलडाणा) या दोघांचा समावेश होता. यातील निलेश मुसळे यांनी हा धान्यसाठा आपला असून आपण याला इतरत्र विकण्यासाठी शेख आमीर यांना विकला असल्याचे सांगितले. सदर तांदुळ व गहुचा साठा त्याने कुठुन आणला याबाबत त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने सदरचा माल हा ओम ट्रेडर्स, ऐ. बी. रोड सांगवी जि.धुळे व निलेश ट्रेडींग, मराठे लेन, धरणगाव जि. जळगाव या कंपनीकडुन खरेदी केले असुन गोडावुन मध्ये असलेले एफ.सी.आय.चे रिकामे बारदाने हे नागणेशी ट्रेडीगंकपनी, कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव यांच्याकडुन खरेदी केली असल्याचे नमूद केले. तर संबंधीत गोडावुन आपण दिलीप एकनाथ महाले रा.धरणगाव यांच्याकडून भाड्याने घेतल्याची माहिती दिली. तथापि, यासाठी सादर केलेला करारनामा हा छाप्याच्या दिवसाचा अर्थात ७ ऑक्टोबर २०२१ चा असल्याचे तपासात दिसून आले.

१२.६३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

या सर्व बाबींचा विचार करून पोलिस पथकाने गहू आणि तांदूळाचा साठा व ट्रक जप्त केला. हा संपूर्ण ऐवज १२ लाख ६३ हजार ४३० रूपयांचा असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात सहायक पोलीस निरिक्षक सचिन पांडुरंग जाधव यांनी धरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार निलेश नामदेव मुसळे (वय.४५ रा. धरणी चौक), धरणगाव आणि शेख आमीर शेख बुडन (वय.३२ रा. मलकापुरा, वार्ड नं.२१, दुर्गानगर, ता.मलकापुरा जि. बुलडाणा) यांच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

April 22, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

April 22, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
गुन्हे

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

April 20, 2026
गुन्हे

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

April 20, 2026
Next Post

जळगाव रोटरी क्लब ऑफ इलाईटतर्फे 'स्वयंसिद्धा' शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय !

October 10, 2020

शहापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श विवाह

April 9, 2021

बोंबला : दोन मित्रांच्या बायका एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या ; घेतला मोठा निर्णय पण..!

February 17, 2022

विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

January 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group