जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस व महानगरच्यावतीने ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या अभियानअंतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सध्या राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या आवाहनानुसार आणि प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात, प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या सुचनेप्रमाणे जळगाव जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस व महानगरच्यावतीने ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या अभियानअंतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष कल्पना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महानगर सचिव कुणाल पवार, उत्तर महाराष्ट्र युवती समन्वयक दिव्या भोसले, अमोल कोल्हे, अशोक लाडवंजारी, वाल्मिक पाटील, सुनील माळी, अशोक पाटील, चंद्रकांत चौधरी, दिलीप माहेश्वरी, ममता तडवी, उज्वला शिंदे, मीनाक्षी चव्हाण, नईम खाटीक, पलक शर्मा, आरोही नेवे, सिद्धी शिंपी, शिल्पा चौधरी, अक्षय वंजारी, गौरव लवंगे, हर्षवर्धन खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.