धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथील वाणी समाज संचालक मंडळाने दिवाळीच्या खर्चात बचत करून एका दिव्यांग मिळाला व्हीलचेअर भेट देऊन त्याला दिवाळीचा आनंद दिला आहे.
धरणगाव येथील माळी वाड्यातील रहिवाशी भूषण विष्णू माळी यांचा लहान मुलगा मनीष भूषण माळी हा दिव्यांग आहे. त्याला व्हीलचेअरची आवशक्यता आहे. ही गोष्ट हेरून येथील वाणी समाज मंडळाचे सचिव सुधाकर येवले, उपाध्यक्ष संजय मालपुरे, संचालक चंद्रशेखर मुसळे, प्रशांत केले, प्रविण कुडे, ललित येवले, मुकुंदा बागड, सुधीर पितृभक्त, अनिल मेणे, बिपिन अमृतकर, किशोर मुसळे, पद्माकर येवले, अविनाश मालपुरे, यांनी मनीष माळी यास भेट देऊन त्यास दिवाळीचा आनंद दिला आहे.
याप्रसंगी वाणी समाज मंडळाचे सचिव सुधाकर येवले यांनी सर्वांना प्रोत्साहित केले आहे.