TheClearNews.Com
Wednesday, November 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : धरणगावजवळ पकडला २३ लाख ५४ हजाराचा गुटखा ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला अटक !

मध्यरात्री चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रोटवद गावाजवळ चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या पथकाने साधारण २४ लाखांचा गुटखा (vimal gutakha) पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गुटखा भरलेली आयशर एरंडोलकडून चोपडा जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. (crime news)

सापळा रचून पकडले वाहन
चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांना गोपनीय खबर मिळाली होती की, आयशर गाडी भरून मोठ्या प्रमाणात केसरयुक्त विमल पान मसाला अर्थात विमल गुटख्याची तस्करी होणार आहे. त्यानुसार एसडीपीओ रावले यांनी आपल्या पथकासह सापळा रचत रोटवद गावाजवळ दि.२३ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास आयशर गाडी अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यात तब्बल २३ लाख ५४ हजार ६०० रुपयाचा गुटखा मिळून आला. तर चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राधेशाम संजय रघुवंशी (रा.पिंपळकोठा),असे सांगितले. तसेच गाडी मालक मनीष सैनी (रा. एरंडोल), असल्याची माहिती दिली. दरम्यान, या दोघांविरुद्ध पो.ना.चंदूलाल सोनावणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

यांनी केली कारवाई
चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वात ही कारवाई पो.नी. राहुल खताळ आणि पो.ना.चंदूलाल सोनावणे, रवी पाटील, नाना ठाकरे, पोकाॅ प्रवीण पाटील,संदीप पाटील, शाम भिल, करीम सय्यद, मिलिंद सोनार, मिलिंद संदानशिव यांनी केली. पोलिसांनी २३ लाख ५४ हजाराचा गुटखा आणि ८ लाखाचे वाहन असा एकूण ३१ लाख ५४ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी !
दरम्यान, अटकेतील संशयित आरोपी रघुवंशी याला धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्याचा चार दिवसांनी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे गाडी तथा गुटखा मालक मनीष सैनी याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

November 25, 2026
गुन्हे

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 25, 2026
धरणगाव

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

November 24, 2026
गुन्हे

भरदिवसा वृद्धेवर हल्ला; १० हजारांची लूट करून संशयित फरार

November 24, 2026
गुन्हे

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

November 23, 2026
गुन्हे

एका हट्टामुळे १० वर्षांच्या जगदीशला मिळाले जीवनदान;

November 23, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हयातून आणखी तीन गुन्हेगार हद्दपार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतूससह कानळदा येथील तरुणाला देवगाव येथून अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

September 16, 2024

खळबळजनक : जळगावात एकाच्या घरावर दगडफेकसह चक्क गोळीबार !

July 27, 2023

कंडारी बु. येथे ग्रामसभेत राडा ; धरणगाव पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

December 4, 2022

… अतिरेकाचा वापर करूनच भाजपनं २०१४ साली निवडणुका जिंकल्या : शिवसेना

June 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group