मुक्ताईनगर (प्रतिनिधी) आज सकाळी मुक्ताईनगरात महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आला आहे.
मुक्ताईनगर कुंड रस्त्यावरील एका पुलाजवळील झाडाझुडपात अज्ञात ४० ते ४५ वयोगटातील महिलेचे प्रेत पिशवीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात मुक्ताईनगरचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. परंतू मृतदेहाची अवस्था बघता हा खून साधारण तीन दिवसापूर्वी झाला असावा,असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. तसेच मृतदेह पूर्ण भूगलेला असल्यामुळे शरीरावरील मारहाणीच्या काही खुणा आहेत का?, हे व्यवस्थित समजू शकलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला असून डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानंतरच आय महिलेचा खून नेमका कसा करण्यात आला आहे, हे समजू शकणार आहे.