धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एका बैठकीत जनता कर्फ्यु ३० मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील कोरोनाची गंभीर परिस्थिती बघता बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रांत गोसावी, मुख्यधिकारी, तहसीलदार, पी आय हिरे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवशेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ तसेच गावातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगलदास भाटिया, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय भाऊ कोठारी, भाजीपाला व्यापारीचे अध्यक्ष भगवान महाजन, भानुदास विसावे, काँग्रेसचे विकास लांबोळे, नगरसेवक गुलाब मराठे, विजुभाऊ सोनार हे सर्व मान्यवर बैठकीला उपस्थित होते.