TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काकाने पुतण्या आणि त्याचा मित्राचा केला सिनेस्टाईल खून ; समोर आले धक्कादायक कारण !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) सोमवारी रात्री ११ वाजता पोलिसांना कोळंबी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. घटनास्थळावर पोलिस पोहोचल्यानंतर मात्र, अज्ञात मारेकऱ्यांनी दोन युवकांना निर्दयीपणे चाकू व लोखंडी रॉडने वार करून जागेवरच ठार केल्याचे दिसले. दोघांचा एकाच वेळी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. अविनाश हनुमंत कटरे (३२, रा.पाटापांगरा, ता. घाटंजी, ह. मु. चापडोह, यवतमाळ), उज्ज्वल ऊर्फ गोलू नारायण छापेकर (२८, रा. डेहनकर ले-आऊट) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही अविनाशच्या पाटापांगरा या गावावरून दुचाकीने यवतमाळकडे येत होते. त्यांना मारेकऱ्यांनी कोळंबी फाट्यावर अडवून ठार केले होते.

अपर पोलिस अधीक्षक पीयुष जगताप, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, दीपमाला भेंडे यांनी घटनास्थळ गाठत मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या हातावर नाव गोंदलेले होते. त्यावरून शोध सुरू केला. पहाटेपर्यंत मृतांची ओळख निश्चित झाली. नेमकी हत्या कशातून झाली, याचा उलगडा पाटापांगरा या गावातूनच झाला. वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून सुरू असलेला वाद विकोपाला जावुन चुलत काकाने मित्रांच्या मदतीने मिळून पुतण्या आणि त्याचा मित्राचा खून केल्याचे तपासात उघड झाले.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

पोलीस तपासात समोर आले की, पाटापांगरा गाव गाठून चौकशी केली असता मृत अविनाश याच्या पाटापांगरा ता. घाटंजी गावात वडिलोपार्जित असलेल्या घराच्या जागेच्या हिस्सेवाटनीत आलेली जागा रिकामी करुन देण्याच्या कारणावरून त्याच्या चुलत आजी व तीचा मुलगा विकास कटरे याच्याशी वाद सुरू होता. त्यातूनच आरोपी विकास लालचंद कटरे (२३. रा. पाटापांगरा, ता घाटजी), भारत दिगांबर गाडेकर (२२), गजानन रामराव मोरे (२५, दोघे रा. मोहंमदपूर, ता बाभूळगाव) यांनी कट रचून दोघांची हत्या केल्याचे उघड झाले.

मृतक अविनाश कटरे व विकास कटरे यांच्यात वडिलोपार्जित जागेवरून वाद होता. या जागेसाठीच मृतक अविनाश हा पाटापांगरा येथे जाऊन चुलत आजी राधाबाई हिला धमकावत होता. सोमवारी त्याने आजीसोबत वाद घातला व तिला धक्काबुक्की केली. त्यामुळे संतापलेल्या विकासने बदला घेण्याचा निर्णय घेतला. अविनाश व उज्वल हे दोघे यवतमाळकडे निघाले असता त्यांच्या मागूनच विकासने दोन मित्रांना सोबत घेऊन सिनेस्टाईल पाठलाग केला. दुचाकीला धक्का देऊन दोघांना खाली पाडले आणि त्यांच्यावर चाकूने वार करत सिनेस्टाईल खून केला. त्यानंतर तेथून विकास मित्रासह गळवा ता. बाभूळगाव येथे लपून बसला. पोलिसांनी विकास ताब्यात घेतल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अवघ्या १६ तासात खुनाच्या गुन्ह्याची उकल करत आरोपींना अटक केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

चार मुलांसह पहिली बायको सोडली, दुसरीसोबत 'लिव्ह इन'मध्ये अन् तिसरी तर अल्पवयीन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा” : पंतप्रधान मोदी

October 22, 2021

मोठी बातमी : प्रवीण मुंढे मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त ; कुमार चिंता यांचीही बदली !

November 7, 2022

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प : आ. गिरीश महाजन

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group