जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हॉलमध्ये तांबापूर येथे झालेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमी वर शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीत मार्गदर्शन करतांना एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोनी प्रतापसिंग शिकारे बोलत होते. त्यांनी उपस्थितांनाच प्रश्न केलाहे कसे थाबवता येईल? तुम्हीच पुढाकार घ्या,तुम्हीच जातीय सलोख टीकवन्यासाठी एकजुटिने काम करा व आम्हास नव्हे तर जळगाव पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात आपले वर्चस्व सिद्ध करा असे आवाहन केले.
बैठकीत तांबापुर सह इतर ठिकाणी पुन्हा जातीय तणाव निर्माण होणार नाही बाबत चर्चा करण्यात आली. तसेच सदर भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे बाबत आवाहन करण्यात आले. तसेच सध्या सुरु असलेल्या नुपूर शर्मा ह्यांच्या वादग्रस्त वक्तव्यवरून शहरात कायदा व सुव्यवस्थे चा प्रश्न निर्माण होऊ देऊ नये बाबत सुद्धा पोलिसांनी आवाहन केले.
बैठकीत यांची होती उपस्थिति
बैठकीस सौ शोभा चौधरी( शिवसेना) अशोक लाडवंजारी(महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी), इब्राहिम पटेल (नगरसेवक ), फारुख शेख अब्दुल्ला, जिल्हाअध्यक्ष मणियार बिरादरी, गणेश सोनवणे (नगरसेवक ) अहेमद (जिल्हा अध्यक्ष AIMIM), ज़िया बागवान मनोज अहुजा (नगरसेवक) रागीब अहमद, अनीस शाह, दानिश अहमद, सलीम इनामदार, आसिफ शाह व बंधु ,वाहिद शेख, रियाज काकर,संजय जाधव, किरण राजपूत, रहीम तड़वी,तसेच २५ ते ३० शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
यांनी दिल्या सूचना व पर्याय
इब्राहिम पटेल
एक समिति स्थापन करून त्यांनी त्वरित करवाई करावी व सीसीटीव्ही लावण्याची सूचना केली.
अशोक लाडवंजारी
खबरी ने दिलेली खबर तपासून पहावी व निरपराध लोकना नाहक त्रास देता कामा नये.
डॉ. रागिब जागीरदार
बेकायदेशीर कार्य करणारे वर पोलिसांनी वेळीच करवाई करून मोहल्ला समितिच्या मध्यमाने कार्नर मीटिंग घेऊन सलोखा निर्माण करावा.
फारूक शेख
उपस्थितातर्फे बोलताना त्यांनी प्रथमच पोलिस आपणास मान देत नसून तो काटेरी मुकुट आपणास घालित आहे. आता त्या काटेरिला गुलाबाचे मुकुट करण्याची जवाबदारी आपली आहे. त्या साठी दर आठवड्यात बूत वाइस किवा मोहल्ला वाइस कार्नर सभा घेऊन तेथील नागरिकांना व खास करून दंगलीचे दुष्परिणाम समजून सांगावे, बेकायदेशीर कार्य करणाऱ्याना आपणच समजूत घालावी, वाइट प्रवृत्ति च्या तरुणाना विश्वासात घेऊन काम करावे लागेल व त्यावर ही समजत नसेल तर अशा लोकांना आपणच होउन पोलिसांकड़े सुपुर्द करावे अशी सूचना व पर्याय दिले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार गोपनीय विभागाचे सहा. पोलिस उपनिरीक्षक विश्वास बोरसे यांनी केले.