धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील ६ मध्ये माजी नगरसेविका संगीता मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली निघाली. या रॅलीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
धरणगावातील प्रभाग क्रमांक सहा येथे महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारानिमित्ताने हनुमान नगर, पारधी वाडा,मराठे गल्ली,पाटील वाडा, पारोळा नाका परिसर,वाणी गल्ली, बालाजी गल्ली, धरणी चौक, कुंभारवाडा,या परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली. याप्रसंगी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी,मनसे, या सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.