TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
September 9, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

धुळे (प्रतिनिधी) – स्मार्ट वीज मीटर बसवण्यास विरोध करून शासकीय कामात अडथळा आणत एका ग्राहकावर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महावितरणच्या अभियंत्यांस मारहाण, शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली. धुळे शहर व परिसरात महावितरण कर्मचाऱ्यांना स्मार्ट मीटर बदलताना मज्जाव व मारहाण केल्याची ही आठवडाभरातील तिसरी घटना आहे. सतत होणाऱ्या या प्रकारांमुळे स्मार्ट मीटरला अडथळे आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
महावितरणच्या पारोळा रोड कक्षाचे सहायक अभियंता आकाश बावणे हे बुधवारी 9 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास तंत्रज्ञ दीपक पाटील, एनसीसी कंपनीचे स्मार्ट मीटर बदलणारे शोएब गुलाब शेख असे तिघेजण फ्लॅट नं. 401, डोंगरे महाराज नगर येथे ग्राहकाचे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी गेले होते. त्यांनी तेथे राहणाऱ्या रत्नाबाई सुनील नेरकर यांना नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे फायदे समजावून सांगितल्यावर त्यांनी मीटर बसवण्यास होकार दिला आणि त्या घरात निघून गेल्या. पथकाने मीटर बसविले. अपडेट करण्याचे बाकी असताना रत्नाबाई सुनील नेरकर खाली आल्या. त्यांचे पती सुनील नेरकर यांना फोन लावून दिला. अभियंता बावणे यांनी नेरकर यांना फोनवर स्मार्ट मीटरचे फायदे समजावून सांगितले. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी चारचाकी वाहनातून 3 इसम आले. त्यातील घरमालक सुनील नेरकर याने सहायक अभियंता कोण आहे असे विचारत बावणे यांना चापट मारली व अर्वाच्य शिवीगाळ केली. नेरकर हा बावणेंना मारण्यासाठी अंगावर पुन्हा धावून येत होता. ‘तुला पाहून घेईल. तू नेहमी इथून ये-जा करत असतो,’ अशी जिवे मारण्याची धमकी बावणेंना दिली. याबाबत बावणे यांच्या फिर्यादीवरून सुनील नेरकर याच्यावर आझादनगर पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Case registered against person opposing installation of smart electricity meters.Dhule

Related Posts

गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कराल काय स्वतःला अटक?; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

November 6, 2020

कसार्‍यात रेल्वेचा ब्लॉक ; धुळे-मुंबई एक्स्प्रेस रद्द : 25 गाड्यांचे बदलले मार्ग

October 18, 2024

गुलाबराव ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे आले?, हे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना माहितीय : एकनाथ शिंदे !

January 8, 2023

भवरखेडे येथील शेतकऱ्याची मोटारसायकल चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group