धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र ही संतांची भूमी त्यात संताजी महाराज हे थोर संत होते. आज श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नगरपालिकेत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पि. एम. पाटील, तेली समाज अध्यक्ष सुनील चौधरी, नितीन चौधरी, राष्ट्रीय चर्मकार समाज कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक वासूदेव चौधरी, विजय महाजन, किरण मराठे, शरद करमाडकर, जितेंद्र धनगर, दै लोकशाहीचे भरत चौधरी, शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे, कमलेश बोरसे, पापा वाघरे तसेच तेली समाजाचे खजिनदार सुनील चौधरी (सूर्या बॅटरी), दिपक चौधरी सर्व शिवसेना पदाधिकारी नगरसेवक तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते.